नवी दिल्ली : यूकेतील प्रमुख ब्रँड्सपैकी एक, मार्क्स अँड स्पेन्सरने आज भारतातील
प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट्सपैकी एक लॅक्मे फॅशन वीक X FDCI मध्ये आपला नवीन ऑटम-विंटर  कलेक्शन
सादर केला. या वर्षीचे कलेक्शन ‘बिग ऑटम एनर्जी’ या संकल्पनेवर आधारित होते, जे हंगामाच्या उत्साहपूर्ण
उर्जेचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवते.

या विशेष प्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर प्रथमच रॅम्पवॉक करताना दिसली. तिच्या जोशपूर्ण
उपस्थितीने संपूर्ण इव्हेंटला ऊर्जा मिळाली आणि कलेक्शनचा आत्मा ठळकपणे पुढे आला. ती एका मोनोक्रोम
फॉक्स लेदर पोशाखात जबरदस्त दिसत होती; तिने एक स्लीक हाय-वेस्ट लाइन लेदर लूक मिडी स्कर्टला मॅचिंग
स्लीव्हलेस फॉक्स लेदर टॉपसह पेअर केले, स्वच्छ गोल नेकलाइन आणि मागच्या बाजूला बटण बांधून तिचा
लूक पूर्ण केला. मनूच्या मोनोक्रोम लूकने सीझनच्या ॲम्बर टोनचे सुंदर प्रदर्शन केले. मनू भाकरने तिच्या
आत्मविश्वासपूर्ण वॉकने प्रेक्षकांना मोहून टाकले.

मार्क्स अँड स्पेन्सरच्या क्लोदिंग अँड होम मार्केटिंग डायरेक्टर अ‍ॅना ब्रेथवेट म्हणाल्या “आम्ही ऑटम
हंगामाकडे वाटचाल करत आहोत, परंतु मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये आम्ही हंगामाच्या उत्साहाला कायम ठेवतो.
आमची ऑटम मोहीम ‘बिग ऑटम एनर्जी’ या उर्जेला आत्मसात करण्यावर केंद्रित आहे. आम्ही आमच्या
ग्राहकांना आत्मविश्वासाने आणि स्टाईलने या नवीन हंगामाचा आनंद घेण्यासाठी प्रेरित करतो.”

या कलेक्शनमध्ये डेनिम, निटवेअर आणि आउटरवेअरपासून ते प्रत्येक महिलेच्या वार्डरोबसाठी आवश्यक
स्टायलिश पीसेस, जसे की ब्लू वेलवेट सूटचा समावेश आहे. मार्क्स अँड स्पेन्सरचे हे कलेक्शन प्रत्येक
ग्राहकाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी तयार आहे.

या प्रसंगी बोलताना मनू भाकर म्हणाल्या, “मार्क्स अँड स्पेन्सरसाठी रॅम्पवर वॉक करणे हा माझ्यासाठी एक
संस्मरणीय अनुभव होता. ‘बिग ऑटम एनर्जी’ ही थीम आणि कलेक्शनचा जोश खरोखरच प्रेरणादायी आहे.
मार्क्स अँड स्पेन्सरचे कपडे परिधान केल्यावर मला अत्यंत उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते. हा
कलेक्शन हंगामाला नवीन उर्जेने साजरा करण्यासाठी प्रेरित करतो.”

मार्क्स अँड स्पेंसरच्या ऑटम विंटर कलेक्शनबद्दल -