पुणे (प्रतिनिधी) : अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अधिवेशन येत्या रविवारी २० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत आहे.
“हम भारत के पूर्व सैनिक,नई प्रेरणा लाये है,देश की रक्षा करते थे,अब इसे सजाने आये है” हे गीत गुणगुणत समाजभान जपणारी सेवा निवृत्त सैनिकांची संस्था म्हणजे अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद.
सेवा,साहस व सन्मान हे ब्रीद वाक्य घेऊन पूर्व सैनिकांसाठी ही संस्था सेवाकार्य करत आहे.लष्कर,हवाई दल व नौदल ह्या तिन्ही दलातून निवृत्त झालेल्यांसाठी ही संस्था कार्य करीत आहे.येत्या रविवारी २० ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड बाय पास रोड वरील “*समर्पण*” या प्रांत कार्यालयात हे एक दिवसीय राज्य अधिवेशन संपन्न होणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त )परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त (मा.राष्ट्रपती यांचे हस्ते प्राप्त) यांचे शुभहस्ते होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मा.अनिलजी भालेराव,कार्यवाह मा.धनंजय धामणे ह्यांची मुख्य उपस्थिती असेल”.अशी माहिती अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राज्य सचिव वीरेंद्र महाजनी (MCPO )यांनी दिली.
अधिवेशनात पूर्व सैनिकांसाठीच्या राज्यातील व केंद्रातील विविध योजना ई.वर चर्चा केली जाईल.मेजर विनय देवगावकर हे परिषदेच्या देवगिरी,कोकण,उत्तर व दक्षिण महाराष्ट्र मधील तर सुभेदार मेजर बाळासाहेब झगडे पश्चिम प्रांत मधील,कॅप्टन अतुल एकघरे,सुभेदार मेजर विनोद बंटे हे विदर्भातील,सीपीओ अनंत जोशी गोवा राज्य,येथील पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या कार्याचा वार्षिक अहवाल सादर करतील.
भोजनोत्तर सत्रामध्ये मेजर विनय देवगावकार संघटित पूर्व सैनिक व देशाची अंतर्गत सुरक्षा-,काळाची गरज या विषयावर,
योगाचे महत्त्व या विषयावर कर्नल उत्तम पाटील हे मार्गदर्शन करणारआहे.अग्निवी या विषयावर कर्नल नरेश गोयल हे माहिती देतील. जागतिक हवामान बदल,जलस्त्रोत या विषयावर कर्नल उन्नीकृष्णन भाषण देतील.
एक दिवसीय अधिवेशनाचा समारोप अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे राज्य संघटन मंत्री मा.रमेशजी देसाई (पुणे) हे करतील.