~ ‘डिश की दिवाली’ या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश प्रीमियम मनोरंजन आणि आकर्षक ऑफरद्वारे कुटुंबांना एकत्र आणणे आहे, ज्यामध्ये नवीन आणि विद्यमान डिश टीव्ही किंवा डी2एच कनेक्शन धारकांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ आणि एक भव्य बम्पर लकी ड्रॉ यांचा समावेश आहे ~
पुणे : भारतातील प्रमुख कंटेंट वितरण कंपन्यांपैकी एक असलेली डिश टीव्ही या दिवाळीला आपल्या ‘डिश की दिवाली’ या उत्सवी मोहिमेसह देशभरातील घरांना उजळवण्यासाठी सज्ज झाली आहे. डिश टीव्हीने नवीन आणि विद्यमान डिश टीव्ही आणि डी2एच ग्राहकांसाठी विशेष रोमांचक ऑफर सुरू केल्या आहेत. या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश प्रीमियम मनोरंजनासह आकर्षक ऑफरद्वारे कुटुंबांना एकत्र आणणे आहे, ज्यामध्ये नवीन ग्राहकांसाठी मोठ्या कॅशबॅक आणि विद्यमान ग्राहकांसाठी लकी ड्रॉ यांचा समावेश आहे.
‘डिश की दिवाली’ मोहिम डिश टीव्ही आणि डी2एच नवीन ग्राहकांसाठी मोठे कॅशबॅक आणि सर्व लोकप्रिय OTT सेवा (वॉचो मॅक्स प्लान) चे एका महिन्याचे सदस्यत्व मिळेल. नवीन ग्राहकांना साप्ताहिक लकी ड्रॉमध्ये आणि मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यातील भव्य बम्पर लकी ड्रॉमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल, जिथे कार आणि इतर रोमांचक बक्षिसे जिंकता येतील. डिश टीव्ही आणि डी2एच ग्राहक देखील त्यांच्या कनेक्शनचे रिचार्ज करून वॉचो मॅक्स प्लानचा लाभ घेऊ शकतात, लकी ड्रॉमध्ये भाग घेऊ शकतात. ग्राहक त्यांचे उत्सवाचे फोटो डिश टीव्हीच्या दिलेल्या लिंकवर अपलोड करू शकतात आणि सोशल मीडियावर शेअर करून देशभरातील लोकांना शुभेच्छा देऊ शकतात.
या उत्सवात अधिक आनंद भरून कुटुंबांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने डिश टीव्हीने दिवाळीत साप्ताहिक आणि बम्पर लकी ड्रॉची मालिका सुरू केली आहे. जे ग्राहक नवीन कनेक्शन घेतात किंवा रिचार्ज करतात, ते साप्ताहिक ड्रॉमध्ये भाग घेऊ शकतात आणि स्कूटी, रेफ्रिजरेटर, टेलीविजन आणि इतर अनेक बक्षिसे जिंकू शकतात. दर आठवड्याला, २३ विजेत्यांची निवड केली जाईल, ज्यामुळे अनेकांना जिंकण्याची संधी मिळेल. साप्ताहिक बक्षिसे जिंकल्यानंतर ग्राहक पुढील ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, ज्यामुळे सर्व सहभागींसाठी रोमांचक आणि न्याय्य प्रक्रिया राहील. मोहिमेचा शेवट बम्पर लकी ड्रॉसह होईल, ज्यामध्ये प्रमुख बक्षिसांमध्ये किआ SUV, टाटा टियागो, अल्टो कार, पल्सर बाइक, आयफोन, लॅपटॉप आणि बरेच काही समाविष्ट आहे.
डिश टीव्ही इंडिया लिमिटेडचे सीईओ आणि कार्यकारी संचालक मनोज डोभाल यांनी सांगितले, “डिश टीव्हीमध्ये, आम्ही प्रेक्षकांचे कोणत्याही स्क्रीनवर, कोणत्याही वेळी, कुठेही मनोरंजन करण्यात आनंद मानतो आणि कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणांना समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या दिवाळीला, आम्ही ‘डिश की दिवाली’ मोहिम सुरू करत आहोत ज्यामध्ये साप्ताहिक लकी ड्रॉ, भव्य बम्पर ड्रॉ आणि मनोरंजनाच्या अनोख्या ऑफर्सद्वारे आम्ही घराघरात आनंद आणि सरप्राइज पोहोचवणार आहोत. आम्ही फक्त मनोरंजन देत नाही, तर आनंदाचे क्षण निर्माण करत आहोत आणि नात्यांना अधिक बळकट करत आहोत.”
रिचार्ज करा, आनंद घ्या आणि ‘डिश की दिवाली’ सह सणाचा जादुई अनुभव घ्या, कारण डिश टीव्ही घरांना आणि मनांना उजळवत आहे