पुणे : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) चा भारतातील दिव्यांग लोकांना आधार देणारा सर्वांगीण सामाजिक उपक्रम असलेल्या समर्थ बाय ह्युंदाई च्या पहिल्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम साजरा करण्यात आला.2023 साली सुरू करण्यात आलेला समर्थ बाय ह्युंदाई हा ह्युंदाई मोटर कंपनीच्या प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी या जागतिक दृष्टिकोनाशी संलग्न असून भारतातील दिव्यांग लोकांच्या समावेशासाठी जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. या विशेष कार्यक्रमादरम्यान कंपनीने समर्थ बाय ह्युंदाई उपक्रमांतर्गत 7 पॅरालिम्पियन्सचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार केला. याबरोबरच कंपनीने दिव्यांग लोकांच्या सक्षमीकरणात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी समर्थ हिरो ॲवॉर्डस् पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली.