पुणे, भारत : लीपस्कॉलर हे परदेशात सर्वसमावेशक शिक्षण संबंधित सेवा देणारे एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. ह्यांनी नुकतीच त्यांच्या पुण्यातील आगामी परदेश शिक्षण मेळाव्याची घोषणा केली. हा कार्यक्रम परदेशात शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांतील विद्यापीठ प्रतिनिधींशी थेट संपर्क साधण्याची संधी देईल. सदर कार्यक्रम शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेल, पुणे येथे होणार आहे.
१५०० हून अधिक विद्यार्थी व पालक ह्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून, उपस्थितांना विद्यापीठ प्रतिनिधींसोबत थेट बोलण्याची संधी मिळेल. तसेच विविध देशांमधील अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी जीवन याबद्दल विशेष माहितीही जाणून घेता येईल. यूके, आयर्लंड, यूएसए, कॅनडा आणि दुबई येथील विद्यापीठांचा प्रामुख्याने सहभाग असेल.
बंगलोर, दिल्ली, पुणे, चेन्नई, नागपूर आणि लुधियाना यासह भारतातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन शाखांमार्फत, लीपस्कॉलर परदेश शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच सुरू झालेली फर्ग्युसन कॉलेज रोड येथील पुणे शाखेतून देखील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम जोमाने सुरू आहे.