राजयोगापासून मिळेल व्यसन मुक्ती ब्रह्माकुमार डॉ. सचिन परब यांचे विचार एमआयटी डब्ल्यूपीयू व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजन
पुणे : ” व्यसनांना कधीही मुळापासून संपविल्या जाता येत नाही. त्यासाठी अंर्तमनातून परिर्वनाची ओढ गरजेचे आहे. जगण्यासाठी व्यसन गरजेचे आहे परंतू ते आध्यात्मिक असावे. त्यासाठी युवकांनी राजयोगाचा सराव करावा.” असे आवाहन ब्रह्माकुमार डॉ.सचिन परब यांनी दिला.
एमआयटी डब्ल्यूपीयू व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे एमआयटी डब्ल्यूपीयू मध्ये आयोजित ‘ व्यसनाधीनता व व्यवसनमुक्तीची वैधानिक प्रक्रिया’ या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ. महेश झगडे, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, ब्रह्माकुमारी नलिनी दीदी, बी.के. दशरत भागवत भाई आणि डॉ. संजय उपाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, डॉ. निरज महेन्द्रु व डॉ. मृदुला कुलकर्णी उपस्थित होत्या.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आर्शिवादाने व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ.सचिन परब म्हणाले,”समाजाच्या बदलत्या वातावरणात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा व मानसिक ताणामुुळे अमली पदार्थांच्या व्यसानाचे प्रमाण वाढत आहे. व्यसन ही तरुणांसाठी एक फॅशनच आहे जी दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरावर औषधांचा मारा करणे, मोबाइलच्या आहारी, सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता युवा मानसिकतेवर हावी होणे आणि वर्तमानकाळातील सिंथेटिक्स ड्रग्स हे सर्वात घातक आहे.”
डॉ परब यांनी आत्मा आणि ईश्वराचा परिचय सांगितला. आपल्या कुटुंबात प्रेम, आनंद शांती आणि आनंदाने जीवन जगण्याचे मार्ग दाखविला. राजयोगाच्या माध्यमातून मनात आनंददायी विचार आणण्याची कला शिकविली. जेव्हा आपले मन आनंददायी विचारांनी प्रफुल्लित होते तेव्हा आपले अंतरंग आनंद व शांती ने परिपूर्ण होते. राजयोगाचा़ सराव करून व्यसनही सोडता येते. व्यसनाचे घातक दुष्पपरिणाम आणि व्यसनापासून दूर कसे राहायचे हे सांगितले. ”
“व्यसन मुक्ती साठी आत्मविश्वास, कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. आनंद मिळण्यासाठी मेंदूतील डोपामिन रसायन वृद्धि आवश्यक आहे. त्यासाठी व्यसनापेक्षा प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरच्या माध्यमातून शिकविल्या जाणार्या राजयोगाचा आधार घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन परब यांनी केले.”
अमितेश कुमार म्हणाले,” वाढत्या फ्रेशर्स पार्ट्या, ड्रिंक पार्टी आणि चोवीस तास मोबाईलच्या आहारी जाण्यापेक्षा युवकांनी शिक्षणाबरोबरच एक चांगला व्यक्ती बनण्यावर अधिक भर द्यावा. सोशल मीडियाची लक्ष्मणरेषा निश्चित करावी. विद्यार्थी जीवनात सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन सर्व व्यसनांना तिलांजली दयावी. अन्यथा पोलिस कायद्या द्वारे कारवाई करण्यात येणार.”
डॉ. महेश झगडे म्हणाले,” तंबाखूमुळे दरवर्षी २६ लाख नागरिकांचा मृत्यू होतो.त्यातच काही औषधे, पेन किलर व कफ सिरफ यांचे व्यवसन वाढतांना दिसतात. देशात गुटखा हा मागच्या दरवाज्याने आत येत आहे ते थांबविण्यासाठी सरकार फेल झाले परंतू सरकारला टॅक्सचे व्यसन लागलेले आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” वर्तमान काळात सतत खाणे हे सर्वात मोठे व्यसन आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारात वृद्धि होतांना दिसतात. तसेच सर्वाधिक बोलणे हे सुद्धा व्यसन आहे. अशा वेळेस आपल्या जीवनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला पाऊले उचलावी लागतील.”
यावेळी डॉ. संजय उपाध्ये यांनी विदेशी संस्कृती भारतीय संस्कृतीवर होतांना कोण कोणत्या गोष्टीचे व्यसन जडत आहे यावर लक्ष केंद्रीत केले. ब्रह्माकुमार दशरथ भागवत यांनी शारीरिक व मानसिक स्वरूपता व्यक्ती व्यसनाधिन होते हे सांगितले. शरीर व आत्मा मिळून मनुष्य बनतो. त्यामुळे संस्कार देने गरजेचे आहे. जीवनात आत्मज्ञानाला उतरविणे गरजेचे आहे.
यावेळी विद्यापीठातील एमएस्सी मानसशास्त्र, लिबरल आर्ट्स, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी व आत्म्न विद्यार्थी क्लबचे सदस्य उपस्थित होेते.
डब्ल्यूपीयूच्या स्टुडन्ट अफियर्सच्या डीन प्रा. डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी व आभार डॉ. शमीम यांनी केले.