सीआयआय नेक्सजेन एक्स्पोमध्ये मोबिलिटीचे भविष्य अनुभवण्याची पश्चिम भारताला संधी – अरविंद गोयल,अध्यक्ष,टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स

पुणे  : द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे मोशी मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (पीआयईसीसी) येथे 18 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हे या एक्स्पोचे दुसरे वर्ष असून इंटिग्रेटिंग इंडियन मोबिलिटी ही या प्रदर्शनाची यंदाची संकल्पना आहे.

वाहन उद्योगातील मोबिलिटीच्या जगातील अद्ययावत तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी हे आघाडीचे व्यासपीठ आहे. या एक्स्पो चे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात इंटर्नल कंबशन इंजिन्स (आयसीई)ते इलेक्ट्रिक,हायब्रिड,सीएनजी/एलएनजी व इथेनॉल/बायोफ्युएल पॉवर ट्रेन्स सह वाहन व तंत्रज्ञानातील व्यापक श्रेणी प्रदर्शित होणार आहे.यामध्ये ऑटोमोबाईल काँपोनंटस,इलेक्ट्रॉनिक्स आणि सबसिस्टिम्समधील नाविन्यपूर्ण उत्पादने देखील बघायला मिळतील.

या एक्स्पो चे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की,एक्स्पो मध्ये सहभागी झालेले भागधारक आणि भेट देणाऱ्या लोकांना इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे परिवर्तित होणारे प्रगत तंत्रज्ञान,इलेक्ट्रिक वाहनांचे डिझाईन्स याचा अनुभव घेता येईल.वाहन उद्योगामध्ये परिवर्तन घडविणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसह मोबिलिटीचे भविष्य या एक्स्पोमध्ये अनुभवायला मिळेल.

ते पुढे म्हणाले की,या व्यासपीठाद्वारे पश्चिम भारतातील सहभागींना मोबिलिटी सोल्युशन्सच्या भविष्याला आकार देणाऱ्या उद्योगातील नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी आणि अद्ययावत वाहन तंत्रज्ञान अनुभवता येईल.

सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 च्या दुसऱ्या आवृत्तीची काही ठळक वैशिष्टये

– एकाच वेळी आयोजित करण्यात आलेली प्रदर्शने
-ऑटो शो 2024 : भारताला जागतिक अभिनवतेचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञान आधारित सोल्युशन्सचे प्रदर्शन
-फ्युएल ऑफ फ्युचर शो 2024 :  भारताच्या उर्जा आणि पर्यावरण संबंधित आव्हानांवर प्रभावी असणाऱ्या ग्रीन हायड्रोजन आणि बायो-इथेनॉलसारख्या पर्यायी आणि शाश्वत इंधनांवर भर देणारे प्रदर्शन
-अर्बन मोबिलिटी शो 2024 : ई -बसेस,ई -बाईक्स व ई-रिक्षा या शहरी ट्रान्सपोर्टेशन सोल्युशन्स अधोरेखित करणारे प्रदर्शन
– वाहन प्रेमींसाठी भव्य प्रदर्शन : हाय ॲन्ड लक्झरी कार्स ते कस्टम बिल्ट ऑफरोडर्स, सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये प्रत्येक वाहन प्रेमीसाठी काही ना काहीतरी आहे.भेट देणाऱ्या लोकांना क्लासिक व्हेईकल्स,भविष्यकेंद्रित डिझाईन्स आणि ग्लोबल ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन सह मोबिलिटीच्या भविष्याला आकार देणारे प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन.
* तज्ञांबरोबर चर्चासत्र आणि उद्योगातील अंर्तदृष्टी : या तीन दिवसीय एक्स्पो मध्ये खालील महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र आयोजित केली गेली आहेत.
* व्यावसायिक व प्रवासी वाहने
* धोरण व नियमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे
* ईव्ही व्यवसाय परिसंस्था
* चार्जिंगसाठी शाश्वत पायाभूत सुविधा
* बॅटरी तंत्रज्ञान
* ऑटोमोटिव्ह आफ्टर मार्केट

याशिवाय ऑटोमोटिव्ह मटेरियल्स,लॉजिस्टिक्स, ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन्स,हायस्पीड ट्रेन्स,रॅपिड मेट्रो,अर्बन एअर मोबिलिटी आणि पायाभूत विकास या विषयांवर देखील चर्चा होईल.

मुख्य प्रदर्शक : या एक्स्पोमधील मुख्य प्रदर्शक खालीलप्रमाणे
व्हेरॉक,आरएसबी ट्रान्समिशन,यझाकी,टाटा ऑटोकॉम्प,टाटा मोटर्स,झेडएफ,आनंद ग्रुप,एआरएआय,एआरएआय – एएमटीआयएफ स्टार्टअप आणि इनोव्हेशन पॅव्हेलियन
परिषदेतील वक्ते : एक्स्पोमध्ये ऑटो शो,फ्युएल ऑफ द फ्युचर,अर्बन मोबिलिटी आणि मोबिलिटी व वाहन डिझाईन या विषयांवर आयोजित चर्चासत्रांमध्ये अनेक तज्ञ सहभागी होतील.यामध्ये सीआयआयच्या पश्चिम विभागातील टाक्स फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल,सीआयआय पश्चिम विभाग 2024-25 चे अध्यक्ष आणि व्ही.एम.साळगावकर ॲन्ड ब्रदर प्रा.लि.च्या अध्यक्ष स्वाती साळगावकर, सीआयआयच्या पश्चिम विभागातील टाक्स फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे सहअध्यक्ष आणि भारतातील झेडएफ समुहाचे अध्यक्ष आकाश पास्से, सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे अध्यक्ष आणि वॉल्वो ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमल बाली, सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे सहअध्यक्ष व आरएसबी ग्लोबलचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा, सीआयआय पश्चिम विभाग 2024-25 चे उपाध्यक्ष आणि बीजी एलआय – इन इलेक्ट्रिकल्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रूषीकुमार बागला,व्हेरॉक इंजिनिररींग लि.चे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन जैन,जेबीएम ग्रुपचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निशांत आर्या,ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) चे संचालक डॉ.रेगी मथाई, सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे सहअध्यक्ष आणि यझाकी इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नायक आदी मान्यवरांचा समावेश आहे.

तंत्रज्ञानातील नवसंकल्पना व नवे सादरीकरण
भेट देणाऱ्या लोकांना खालील क्षेत्रांमधील अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवीन उत्पादने बघायला मिळणार आहेत.
* इलेक्ट्रिकल व्हेईकल्स,आरॲन्डडी ॲन्ड मॅन्युफॅक्चरिंग
* मशिन लर्निंग,आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲन्ड द इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी)
* इलेक्ट्रिक मोबिलिटी
* ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री 4.0
* ईव्ही ॲन्ड आयसीई ऑटोकाँपोनंटस
* स्पेशल नीश ल्युब्रिकंटस
* इलेक्ट्रिकल कमर्शियल व्हेईकल्स
* अर्बन मोबिलिटी ॲन्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन टेक्नोलॉजिज्‌‍
* एनर्जी ॲन्ड ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स
* ॲडव्हान्स्ड मटेरियल्स
* एरोस्पेस ॲन्ड स्पेस टेक्नोलॉजी
* क्लीनटेक ॲन्ड सस्टेनेबिलिटी
* ऑटोमेशन ॲन्ड ड्राईव्हज्‌‍,पोल्युशन कंट्रोल ॲन्ड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स