पुणे :- एस्सिलोर या जगभरातील आघाडीच्या प्रिस्क्रिप्शन लेन्सेस ब्रँडने भारतातील ब्रँडची ओळख असलेल्या विराट कोहली यांच्यासोबत त्यांची नवी वॅरिलक्सची जाहिरात सादर केली आहे. वयोमानाप्रमाणे ४० नंतर येणारे दृष्टिदोष दूर करण्यासाठी पर्याय शोधत असलेल्या ग्राहकांसाठी वॅरिलक्स हा सुयोग्य पर्याय असल्याचे या जाहिरातीतून दाखवले जाणार आहे. या जाहिरातीत विराट कोहली वॅरिलक्स प्रोगेसिव्ह लेन्सेसचे महत्त्व विषद करतील आणि त्याचे फायदे सांगतील. ते आपल्या कोचला प्रत्येक अंतरावर सुस्पष्ट दृष्टीसाठी वॅरिलक्स® वापरण्याचा सल्ला देताना दिसतील.