गोदरेज इंटेरिओचे आर्थिक वर्ष 2025 पर्यंत ई-कॉमर्समधून 10% महसुलाचे लक्ष्य ~ FY24 मध्ये ऑनलाइन विक्रीत तीन पटीने वाढ; आर्थिक वर्ष 25 च्या अखेरीस 100% ई-कॉमर्स वाढीचे उद्दिष्ट

 

 

मुंबई : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या आणि गोदरेज – बॉइसच्या भारतातील अग्रगण्य होम आणि ऑफिस फर्निचर ब्रँडपैकी एक, गोदरेज इंटेरिओ ई-कॉमर्स विक्रीला चालना देऊन आपली ऑनलाइन उपस्थिती लक्षणीयरित्या वाढविण्यास सज्ज आहे. वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल रिटेल लँडस्केपमध्ये इमर्सिव्ह आणि वैयक्तिकृत ग्राहक अनुभव तयार करण्याच्या ब्रँडच्या दृष्टीकोनाशी हा उपक्रम संरेखित आहे.

भारतातील ई-कॉमर्स उद्योग 2030 पर्यंत $350 अब्ज ओलांडण्याचा अंदाज आहे. आधुनिक ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोदरेज इंटेरिओ आपल्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रयत्नांना गती देत आहे. समकालीन जीवनशैलीला पूरक असलेल्या घरगुती फर्निचरच्या वाढत्या मागणीमुळे या ब्रँडने गेल्या वर्षभरात ऑनलाइन विक्रीत भरीव वाढ पाहिली आहे. गोदरेज इंटेरिओने 17,200 पिन कोडमध्ये उत्पादने वितरीत करण्यासाठी आपला विस्तार केला आहे. यामुळे देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख (B2C) देव सरकार म्हणाले, “ग्राहकांचा अनुभव वाढवण्याची आमची वचनबद्धता आमच्या ई-कॉमर्स धोरणाचा गाभा आहे. डिजिटल रिटेल क्षेत्रामध्ये अभूतपूर्व वाढ होत असल्याने, आम्ही देखील या प्रवाहात उतरून गोदरेज इंटेरिओची गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णता दर्शवणारा ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव ग्राहकांना देण्यास उत्सुक आहोत. प्रगत डिजिटल साधने आणि वैयक्तिकृत मार्केटिंग धोरणांचा लाभ घेऊन, भारतभरातील ग्राहकांसोबत जोडण्याचे आमचे ध्येय आहे.”

गोदरेज इंटिरिओ अत्याधुनिक ई-कॉमर्स तंत्रज्ञानासह त्याचा डिजिटल प्रेझेन्स वाढवण्याच्या तयारीत आहे. ब्रँडच्या वेबसाइटवर AI वापरून एक नावीन्यपूर्ण ‘व्हिज्युअल सर्च’ टूल देण्यात आलेले आहे. याद्वारे ग्राहकांनी अपलोड केलेल्या प्रतिमा आणि होम कॉन्फिगरेशनवर आधारित उत्पादनांची शिफारस करण्यात आली आहे. उत्तम नेव्हिगेशन, इमर्सिव्ह उत्पादन व्हिज्युअलायझेशन आणि विस्तारित डिजिटल मार्केटिंग उपक्रम खरेदीचा अनुभव सुंदर बनवतात. वेबसाइट फर्निचर एक्स्चेंज सुविधा देखील देते जिथे जुने फर्निचर एक्स्चेंज केले जाऊ शकते. गोदरेज इंटेरिओ आपल्या डीलर नेटवर्कला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट करत आहे, याद्वारे थेट ऑर्डरिंग आणि देशव्यापी डिलिव्हरी सक्षम करते, अशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणे सोपे होईल.

मजबूत ऑनलाइन उपस्थितीला पूरक म्हणून, गोदरेज इंटेरिओ विविध आणि विवेकी ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नवनवीन ऑफर्स देत आहे. टिकाऊपणा हे ब्रँडचे वैशिष्ट्य आहे. त्याच्याच सोबत आता सौंदर्य आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून, घर आणि कार्यालयीन फर्निचर विभागांमध्ये एक प्रमुख ब्रँड म्हणून त्यांनी स्वतःला प्रस्थापित केले आहे. भारतातील ई-कॉमर्स लँडस्केप विकसित होत असताना, ऑनलाइन फर्निचर रिटेलच्या भविष्याला आकार देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची भूमिका निश्चितच महत्त्वाची असणार आहे.