ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून ‘आर्ट फॉर होप’ सीएसआर उपक्रमाच्या चौथ्या सीझनसाठी अर्ज करण्याचे आवाहन
गुरूग्राम : ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने त्यांचा प्रमुख आर्ट उपक्रम ‘आर्ट फॉर होप’च्या चौथ्या सीझनची घोषणा केली आहे. गेल्या तीन सीझन्समध्ये या उपक्रमाने उदयोन्मुख व कमी प्रतिनिधीत्व केलेल्या कलाप्रकारांना प्रकाशझोतात आणण्यास साह्य केले आहे, तसेच आर्टिस्ट्सना आर्थिक अनुदानांसह मदत केली आहे आणि त्यांची कौशल्ये व टॅलेंट दाखवण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ दिले आहे. हा उपक्रम संपूर्ण भारतातील विविध समुदायांमधील विकलांग व्यक्तींसह आर्टिस्ट्सना प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील देतो.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशलचे व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद म्हणाले, “आर्ट (कला) परिवर्तनाला चालना देते. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये आम्ही भारतमध्ये सीड्स ऑफ गूड पेरण्याच्या प्रवासावर आहोत. ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनने आपल्या आर्ट फॉर होप उपक्रमाच्या माध्यमातून आर्टिस्ट्स व आर्ट कलेक्टिव्ह्जसाठी शाश्वत इकोसिस्टम तयार करण्यास मदत केली आहे, जे कलेच्या माध्यमातून अनेक पैलू व अभिव्यक्ती दाखवू शकले आहेत. भारतात कला व संस्कृतीची संपन्न टेपेस्ट्री आहे आणि आमचा विश्वास आहे की, आर्ट फॉर होप उपक्रम आपल्या समर्पित मार्गदर्शन व अनुदानांच्या माध्यमातून प्रतिभावान आर्टिस्ट्ससाठी कॅन्व्हास म्हणून सेवा देत राहिल.”
आर्ट फॉर होप उपक्रमाने गेल्या तीन सीझन्समध्ये १०० हून अधिक आर्टिस्ट्स व आर्ट कलेक्टिव्ह्जना एकूण १.०५ कोटी रूपयांचे अनुदान दिले आहे. हा उपक्रम सकारात्मकता व विकासाला प्रेरित करत आहे, भारतातील वैविध्यपूर्ण आर्ट क्रिएटर्ससाठी ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ प्रवासाला दाखवत आहे.
आर्ट फॉर होप – सीझन ४:
आर्ट फॉर होप उपक्रमाचा उदयोन्मुख व कमी प्रतिनिधीत्व असलेल्या आर्टिस्ट्सना, तसेच तरूण, महिला व ग्रामीण क्रिएटर्सना चित्रकला, शिल्पकला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, संगीत आणि पारंपारिक हस्तकला अशा विविध कलाप्रकारांमध्ये व्यासपीठ देण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम प्रचलित सामाजिक समस्या जसे हवामान बदल, मानवाधिकार व सामुदायिक स्थिरतेला दाखवत कलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाला चालना देतो. विकलांग आर्टिस्ट्सना पाठिंबा देत आर्ट फॉर होप उपकम कला सर्वांसाठी उपलब्ध होण्याजोगी व सर्वसमावेशक राहण्याची खात्री घेतो.
प्रमुख तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: नोव्हेंबर १०, २०२४
- प्रकल्प अंमलबजावणी कालावधी: नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४
- अनुदान प्रदर्शन: २०२५ च्या सुरूवातीला
अनुदानाबाबत तपशील:
- वैयक्तिक अनुदान: विकलांग व्यक्तींसह व्यक्ती व टीम्ससाठी प्रत्येकी १ लाख रूपयांचे ४० अनुदान.
- संस्थात्मक अनुदान: आर्ट कलेक्टिव्ह्ज व संस्थांसाठी प्रत्येकी १ लाख रूपयांचे १० अनुदान.
निवडक आर्टिस्ट्स व आर्ट कलेक्टिव्ह्जना त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्यास मदत करण्यासाठी उद्योग व्यावसायिकांकडून आर्थिक साह्य, संसाधने व मार्गदर्शन मिळेल.
अर्ज करण्यासाठी खुल्या असलेल्या श्रेणी:
- व्हिज्युअल आर्ट: चित्रकला, पेन्टिंग, शिल्पकला आणि डिजिटल हस्तक्षेपाचा समावेश नसलेली मिक्स मीडियाचे सर्व प्रकार.
- डिजिटल आर्ट: फोटोग्राफी, नवीन मीडिया आर्ट्स, फिल्ममेकिंग, मल्टीमीडिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन करण्यात आलेले डिजिटल आर्ट्स.
- परफॉर्मिंग आर्ट: संगीत, मूव्हमेंट आर्ट्स आणि इतर परफॉर्मिंग आर्ट्स.
- पारंपारिक कला व संस्कृती: भारताच्या लोककला व हस्तकला, तसेच लोक संगीतकार, परफॉर्मर्स आणि संशोधन किंवा कारागीर सक्षमीकरण प्रोग्राम्स.
- फंक्शनल इनोव्हेटिव्ह आर्ट अँड क्राफ्ट: हस्तकलांचा वापर करत टिकाऊ, पर्यावरणपूरक किंवा उपयुक्त उत्पादन इनोव्हेशन्सवर लक्ष केंद्रित करणारे प्रकल्प.
आर्टिस्ट्स hyundaiartforhope.com येथे अर्ज करू शकतात आणि त्यांचे प्रकल्प नामांकन सबमिट करू शकतात. या उपक्रमाबाबत प्रमुख तपशील वेबसाइटवर देखील पाहता येऊ शकते. आर्टिस्ट्स या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी contactus@hyundaiartforhope.com येथे संपर्क साधू शकता.