चांदीच्या दागिन्यांची आवड असणारे ग्राहक 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील सिल्वोस्टाईलच्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये आणि ऑनलाईन पध्दतीने ऑफरचा लाभ घेऊ शकतील
पुणे : भारतातील आघाडीच्या सिल्व्हर ज्वेलरी ब्रँडसपैकी एक असलेल्या सिल्वोस्टाईल तर्फे सर्व दागिन्यांच्या कलेक्शनमधील एमआरपीवर 20 टक्क्यांपर्यंत सवलत देणारी बहुप्रतिक्षित दिवाळी मोहिम सादर करण्यात आली आहे. ही मोहिम 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार असून संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व सिल्वोस्टाईल दालनांमध्ये आणि ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. या मोहिमेत इंटरनेटवर लोकप्रिय झालेली व उभरती बॉलिवूड अभिनेत्री राशा थडानी दिसणार आहे.
दिवाळी जवळ येत असतानाच सिल्वोस्टाईलने पारंपारिक अभिजातता आणि आधुनिक ट्रेंडसचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या चांदीच्या दागिन्यांची उत्कृष्ट श्रेणी सादर केली आहे.आपल्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटचा एक भाग म्हणून उत्तम दागिन्यांच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही श्रेणी एक विशेष आकर्षण आहे.ऑक्सिडाईज्ड दागिन्यांपासून ते टेंपल ज्वेलरी प्रकारातील दागिन्यांपासून प्रेरित आणि मोहक रोझ गोल्ड फिनिश असलेल्या सिल्वोस्टाईलच्या नवीन श्रेणीमध्ये फॅशनची आवड असलेल्या प्रत्येक तरूण व्यक्तीसाठी काहीतरी आहे.
परंपरा आणि अत्याधुनिक शैली यांचे मिश्रण करून फॅशनची नवी परिभाषा करणाऱ्या नवीन पिढीमध्ये स्टर्लिंग सिलव्हर ज्वेलरी ही पसंतीची बनली आहे. किफायतशीरपणा, उत्कृष्ट प्रतिभा आणि सौंदर्याचे आकर्षण यासाठी ओळखली जाणारी स्टर्लिंग सिलव्हर ज्वेलरी युवा ग्राहकांना अधिक खर्च न करता उत्तम दागिन्यांच्या खरेदीचा आंनद देते.
स्टर्लिंग सिलव्हरचा किफायतशीरपणा नव्या पिढीच्या विचारपूर्वक खरेदीच्या तत्त्वांशी अनुरूप असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रतिबिंबित करते. रोजच्या वापरातील पोशाख असो किंवा सणासुदीचा काळ असो स्टर्लिंग सिलव्हर एक उत्तम पर्याय आहे. मिनिमलिस्ट रिंग्सपासून ते स्टेटमेंट नेकलेसपर्यंत,सिल्वोस्टाईल नवीन दिवाळी कलेक्शन नव्या पिढीला आपली शैली व्यक्त करण्यासाठी परिपूर्ण दागिने प्रदान करते.
सिल्वोस्टाईलच्या विपणन,ई-कॉमर्स व सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष हेमंत चव्हाण म्हणाले की, सिल्वोस्टाईल हे तरूणांची पसंती प्रतिबिंबित करते आणि या दिवाळीत आमच्या तरूण ग्राहकांसाठी काहीतरी विशेष करण्याचा आमचा प्रयत्न आहे.चांदीच्या दागिन्यांची श्रेणी ही उत्सवकाळात तरूण ग्राहकांसाठी त्यांच्या शैलीमध्ये आणखी चमक आणण्यासाठी योग्य आहे.व्यापक डिझाईन्सची श्रेणी आणि आकर्षक 20 टक्क्यांपर्यंत सवलत यासह तरूणांना दैनंदिन आयुष्यात आणि उत्सवकाळात हे उत्कृष्ट दागिने आणखी सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
या मोहिमेद्वारे सिल्वोस्टाईल स्टर्लिंग सिलव्हर ज्वेलरी कलेक्शनची कलाकुसर कशा पध्दतीने केली आहे,याचबरोबर परंपरा आणि शैलींचा मिलाफ हव्या असणाऱ्या तरूण ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त योग्य खरेदी कशी आहे,हे दाखविण्यात आले आहे.