सॅमसंग तिसऱ्या तिमाहीत २३ टक्‍के व्‍हॅल्‍यू शेअरसह भारतातील स्‍मार्टफोन बाजारपेठेत अव्‍वलस्‍थानी: काऊंटरपॉइण्‍ट रिसर्च

गुरूग्राम, भारत  :  काऊंटरपॉइण्‍ट रिसर्चने जारी केलेल्‍या डेटानुसार, सॅमसंग २०२४ मधील सलग तिसऱ्या तिमाहीसाठी भारतातील मूल्‍याद्वारे पहिल्‍या क्रमांकाचा स्‍मार्टफोन ब्रँड ठरला. २०२४ च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये भारतातील स्‍मार्टफोन बाजारपेठेने सॅमसंगद्वारे नेतृत्वित आतापर्यंतचे सर्वोच्‍च मूल्‍य संपादित केले, जेथे सॅमसंगचा २३ टक्‍के मार्केट शेअर होता, असे संशोधन एजन्‍सीने सांगितले.

“सर्वोत्तम ईएमआय ऑफर्स व ट्रेड-इन्‍सच्‍या पाठिंब्‍यामुळे प्रीमियमाझेशन ट्रेण्‍डच्‍या माध्यमातून बाजारपेठेत मूल्‍य विकासाला चालना मिळत आहे. सॅमसंग सध्‍या २३ टक्‍के शेअरसह मूल्‍याद्वारे बाजारपेठेचे नेतृत्‍व करत आहे, तसेच आपल्‍या फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी एस सिरीजला प्राधान्‍य देत आणि आपला मूल्‍य-संचालित पोर्टफोलिओ वाढवत आपले अग्रणी स्‍थान कायम ठेवले आहे. बाजारपेठेतील उपस्थिती अधिक दृढ करण्‍यासाठी सॅमसंग ए सिरीजमधील मिड-रेंज व किफायतशीर प्रीमियम मॉडेल्‍समध्‍ये गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, तसेच ग्राहकांना उच्‍च किमतीच्‍या विभागांमध्‍ये अपग्रेड करण्‍यास प्रेरित करत आहे,” असे वरिष्‍ठ संशोधन विश्‍लेषक प्राचीर सिंग म्‍हणाले.

तिसऱ्या तिमाहीदरम्‍यान (जुलै-सप्‍टेंबर २०२४) मूल्‍य वाढ एकाच तिमाहीत सर्वकालीन विक्रमापर्यंत पोहोचत वार्षिक १२ टक्‍क्‍यांनी वाढली, असे काऊंटरपॉइण्‍टने सांगितले. आकारमानासंदर्भात स्‍मार्टफोन बाजारपेठ वार्षिक ३ टक्‍क्‍यांनी वाढली, असे काऊंटरपॉइण्‍टने सांगितले.

सुरू असलेल्‍या प्रीमियमाझेशन ट्रेण्‍डने मूल्‍य वाढीला चालना दिली, तर सणासुदीच्‍या काळाला लवकर सुरूवात झाल्‍याने आकारमान वाढीला गती मिळाली. ओईएम्‍सनी चॅनेल्‍सची सक्रियपणे भर केली, ज्‍यामधून खात्री मिळाली की गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत फेस्टिव्‍ह विक्री संथ गतीने सुरू झाली असताना देखील रिटेलर्स सणासुदीच्‍या काळात विक्रीमधील अपेक्षित वाढीसाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज होते, असे संशोधन एजन्‍सीने सांगितले.