पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात विविध सायबर सुरक्षा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. डायरेक्ट ॲक्शन इंटरनॅशनल यूके आणि कॅनेडियन असोसिएशन फॉर सिक्युरिटी अँड इंटेलिजेंस स्टडीज, व्हॅन्कुव्हर कॅनडाद्वारे मान्यताप्राप्त हे अभ्यासक्रम विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.इच्छुक खालील लिंकवर नावनोंदणी करू शकतात – https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
यात २ महिन्यांचा कालावधी असलेला १८ क्रेडिटचा सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट (सीएसएस), ६ महिन्यांचा कालावधी असलेला २० क्रेडिटचा मास्टरींग इन्फॉर्मेशन सिक्युरिटी (एमआयएस) आणि ६ महिन्यांचा कालावधी असलेला २८ क्रेडिटचा सायबर क्राइम इन्वेस्टिगेटर (सीसीआय ) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या हायब्रीड-फॉर्मेट अभ्यासक्रमांमध्ये आक्षेपार्ह आणि बचावात्मक सुरक्षा, सायबर इंटेलिजन्स आणि इन्व्हेस्टिगेशन, सायबर फॉरेन्सिक्स आणि इन्सिडेंट रिस्पॉन्स, डार्क वेब, क्लाउड सुरक्षा, नेटवर्क सुरक्षा आणि क्रिप्टोग्राफी यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटी, कायदा अंमलबजावणी आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील ४० हून अधिक राष्ट्रीय तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये माहिती प्रणालीचे रक्षण करण्याची आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये असावी, या उद्देशाने हे अभ्यासक्रम बनविण्यात आले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले की, ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तंत्रज्ञान विभागातर्फे सुरु केलेला सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हा अशा प्रकारचा अनोखा आणि पहिला उपक्रम आहे, जो उद्योग विशेषज्ञ आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांद्वारे शिकविला जाणारा सखोल व्यावहारिक दृष्टीकोन आणि ज्ञान प्रदान करणारा उपक्रम आहे”.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रजिस्ट्रार प्रा. ज्योती भाकरे म्हणाल्या की,एसपीपीयूच्या तंत्रज्ञान विभागाने ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने तीन महत्वाचे अभ्यासक्रम सुरु केले असून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. एकीकडे तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे सायबर सुरक्षेचे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी कुशल व्यावसायिकांची गरज आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर म्हणाले की, “सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रम हे विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांमध्ये सायबर सुरक्षा जागरुकता आणि कौशल्य- निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तंत्रज्ञान विभागाचे हे अभ्यासक्रम मजबूत सुरक्षा उपाय लागू करून आणि सायबर हल्ले कमी करून भेद्यता ओळखण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक ज्ञानाने सुसज्ज करतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर म्हणाले की, वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षा धोके आणि हल्ले वाढत असताना, कॉर्पोरेट, संस्था आणि सरकार यांच्यासाठी ही एक मोठी चिंता बनली आहे.मला खात्री आहे की तंत्रज्ञान विभागातर्फे ऑफर केलेल्या सायबर सुरक्षा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील अधिक सखोल ज्ञान प्राप्त करून घेता येईल”.
ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि कार्यक्रम संचालक (सायबर आणि नॅशनल सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स प्रोफेशनल लंडन, यूके) डॉ. केतन अत्रे म्हणाले की,”हे अभ्यासक्रम विद्यार्थी, व्यावसायिक आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढत्या चिंतेचे निराकरण आणि त्यांच्या माहिती प्रणालीचे रक्षण करण्यासाठी तसेच सायबर गुन्ह्यांना अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करतील,जे ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज इंडियाने “व्हिजन फॉर द नेशन सायबर सिक्युरिटी स्ट्रैटजी इंडिया” या प्रमुख उपक्रमांतर्गत सुरू केले आहे. ”
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क : 9175558736 / 9175062951