जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या ८ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता कर्तव्यावर असलेल्या एकूण ८ हजार २७२ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा केंद्रावर १४ नोव्हेंबर अखेर टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात नमुना १२ भरुन दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या टपाली मतदानाकरीता १४ नोव्हेंबर अखेर सुमारे १६ हजार मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत, त्यापैकी जुन्नर विधानसभा मतदारसंघात-१३२, आंबेगाव-१४१, खेड-आळंदी-२३१, शिरूर-४००, दौंड-१ हजार २५१, इंदापूर-६०३, बारामती-५२१, पुरंदर-३२०, भोर-७०७, मावळ-३५०, चिंचवड- १ हजार ७२, पिंपरी-४७७, भोसरी-८२, वडगाव शेरी-३४७, शिवाजीनगर-३८२, कोथरूड-१८७, खडकवासला-६५१, पर्वती-१२७, हडपसर विधानसभा मतदारसंघात २९१ असे एकूण ८ हजार २७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान नोंदिवण्याकरीता सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. टपाली मतदान प्रक्रिया १९ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले आहेत.