सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे इन्स्टिट्यूटने कमिन्‍स इंडियाच्‍या रिडिफाइन २०२४ बी-स्‍कूल केस स्‍टडी स्‍पर्धेचे विजेतेपद पटकावले

आयआयएम तिरूचिरापल्‍ली इन्स्टिट्यूटने चमकदार कामगिरी करत उपविजेता पुरस्‍कार पटकावला

 

पुणे, भारत: आज, कमिन्‍स इंडिया लिमिटेड या देशातील आघाडीच्‍या ऊर्जा सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आपली प्रतिष्ठित वार्षिक बी-स्‍कूल केस स्‍टडी स्‍पर्धा ‘रिडिफाइन २०२४’ची सांगता केली. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे येथील सर्वोत्तम टीम मस्‍कटीअर्स स्‍पर्धेची विजेती ठरली, जेथे या टीमला प्रतिष्ठित ट्रॉफी व रोख बक्षीसासह सन्‍मानित करण्‍यात आले. तसेच, आयआयएम तिरूचिरापल्‍ली येथील टीम स्‍ट्रॅटेजिक मॅकक्‍वीन्‍स ने प्रतिष्ठित उपविजेता पुरस्‍कार पटकावला.

यंदाच्‍या स्‍पर्धेची थीम ‘हाऊ डिजिटल सोल्‍यूशन्‍स एनेबल सस्‍टेनेबिलिटी इन ट्रॅडिशनल बिझनेसेस?‘ होती, जेथे सहभागींना समकालीन मर्यादांपलीकडे विचार करण्‍यास प्रेरित करण्‍यात आले. १२६० टीम्‍समध्‍ये सहभाग घेतलेल्‍या एकूण ३७८० विद्यार्थ्‍यांनी देशातील १८ टॉप बी-स्‍कूल्‍सचे प्रतिनिधीत्‍व केले, तसेच संकल्‍पना आणि नाविन्‍यपूर्ण विचारसरणीची देवाणघेवाण केली. सर्वसमावेशक मूल्‍यांकन प्रक्रियेनंतर सहा फायनालिस्‍ट टीम्‍सची निवड करण्‍यात आली, ज्‍यांनी पुण्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या दोन-दिवसीय ग्रँड फिनालेमध्‍ये त्‍यांच्‍या सोल्‍यूशन्‍सना दाखवले. इव्‍हेण्‍टमध्‍ये परस्‍परसंवादात्‍मक लीडरशीप सत्रे, डायनॅमिक नेटवर्किंग संधी आणि कमिन्‍स टेक्निकल सेंटर इंडिया व कोथरूड इंजिन प्‍लांटच्‍या विशेष टूर्सचा (दौरा) समावेश होता. कमिन्‍स इंडिया ऑफिस कॅम्‍पस (आयओसी) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या ज्‍यूरी मूल्‍यांकन राऊंड आणि कर्मचाऱ्यांच्‍या लाइव्‍ह वोटिंगसह फिनालेची सांगता झाली.

कमिन्‍स इंडिया लीडर्सच्‍या प्रतिष्ठित पॅनेलमध्‍ये अनुपमा कौल, ह्युमन रिसोर्सेस लीडर; सुब्रमण्‍यन चिदंबरन, डायरेक्‍टर – कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजी अँड अजय पाटील, चीफ फायनान्शियल ऑफिसर यांचा समावेश होता, ज्‍यांनी ग्रँड फिनालेमध्‍ये फायनालिस्‍ट टीम्‍सच्‍या प्रेझेन्‍टेशन्‍सचे परीक्षण केले. इव्‍हेण्‍टला कंपनीचे वरिष्‍ठ प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. मुख्‍य स्‍पर्धेव्‍यतिरिक्‍त, सर्व फायनालिस्‍ट टीम्‍सनी धमाल सोशल मीडिया कॉन्‍टेस्‍टमध्‍ये सहभाग घेतला. त्‍यांनी लहान व सर्वसमावेशक टीम परिचय व्हिडिओज तयार केले, जे त्‍यांच्‍या कॉलेजच्‍या लिंक्‍डइन पेजवर अपलोड करण्‍यात आले. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे इन्स्टिट्यूटमधील टीम मस्‍कटीअर्स ला त्‍यांच्‍या व्हिडिओसाठी अधिक प्रतिसाद मिळाला आणि या स्‍पर्धेचे विजेते घोषित करण्‍यात आले.

विजेत्‍यांचे अभिनंदन करत अनुपमा कौल, एचआर लीडर, कमिन्‍स इंडिया म्‍हणाल्‍या, ”मी रिडिफाइन २०२४ मध्‍ये दाखवण्‍यात आलेले अविश्‍वसनीय टॅलेंट आणि नाविन्‍यपूर्ण संकल्‍पना पाहून प्रभावित व प्रेरित झाले. सादर करण्‍यात आलेल्‍या काही सोल्‍यूशन्‍समध्‍ये उद्योगात क्रांती घडवून आणण्‍याची क्षमता आहे. मी सर्व विजेत्‍यांचे व सहभागींचे त्‍यांची अ‍थक मेहनत आणि उल्‍लेखनीय योगदानासाठी अभिनंदन करते. ही स्‍पर्धा फक्‍त विजय मिळवण्‍यासाठी नाही तर शिकण्‍याबाबत, सहयोग करण्‍याबाबत आणि नाविन्‍यतेमधील मर्यादांना दूर करण्‍याबाबत आहे. रिडिफाइन आमच्‍या भविष्‍यामध्‍ये दीर्घकालीन धोरणात्‍मक गुंतवणूक आहे. तरूण विचारवंतांना सक्षम करत आम्‍ही आमची कंपनी, उद्योग व देशाच्‍या भविष्‍याला आकार देत आहोत. हा वारसा आहे, जो निर्माण करण्‍याचा आम्‍हाला अभिमान वाटतो.”

सुब्रमण्‍यन चिदंबरन, डायरेक्‍टर – कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजी, कमिन्‍स इंडिया म्‍हणाले, ”रिडिफाइन, मुलभूतरित्‍या, नाविन्‍यतेसाठी अद्वितीय प्‍लॅटफॉर्म आहे. हा प्‍लॅटफॉर्म भावी लीडर्सना आजच्‍या व भावी आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी समीक्षकपणे व सर्जनशीलपणे विचार करण्‍यास सक्षम करतो. संपूर्ण विश्‍व हवामान बदलाचा सामना करत असताना यंदाच्‍या स्‍पर्धेने सहभागींना उत्‍सर्जन कमी करण्‍यासाठी आणि शाश्‍वत उपक्रम वाढवण्‍यासाठी धोरणात्‍मक साधन म्‍हणून डिजिटलायझेशनच्‍या व्‍यापक क्षमतेचा अवलंब करण्‍याचे आव्‍हान दिले. या प्रखर स्‍पर्धेसाठी अधिक वेळ व प्रयत्नांची गरज होती आणि मला सर्व सहभागींची अथक मेहनत व समर्पिततेचा अभिमान वाटतो. मी भविष्‍यात ते संपादित करणारे यश पाहण्‍यासाठी तितकाच उत्‍सुक आहे.”

ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत असताना कमिन्‍स इंडियाने सर्वसमावेशक क्रियाकलापांची सिरीज आयोजित केली, जी विद्यार्थ्‍यांमध्‍ये कुतूहल जागृत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली होती. सहभागींना कंपनीचे मिशन, दृष्टिकोन, व्‍यवसाय धोरण आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्‍यासाठी परस्‍परसंवादी लीडरशीप सत्र आयोजित करण्‍यात आले. तसेच, प्रश्‍नमंजुषा स्‍पर्धेने उद्योग ट्रेण्‍ड्स व डायनॅमिक्‍सबाबत त्‍यांच्‍या ज्ञानाचे मूल्‍यांकन केले, ज्‍यामुळे व्‍यवसाय क्षेत्राबाबत त्‍यांच्‍या माहितीमध्‍ये अधिक भर झाली.

ग्रँड फिनालेमध्‍ये सहभाग घेतलेल्‍या सहा शॉर्टलिस्‍ट करण्‍यात आलेल्‍या टीम्‍स पुढीलप्रमाणे:     

  1. सिम्‍बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे येथील पॉवर इनोव्‍हेटर्स
  2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), लखनौ येथील टीम सीएनपी
  3. आयआयएम मुंबई येथील कार्बन क्रशर्स
  4. सिम्‍बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट, पुणे येथील मस्‍कटीअर्स
  5. आयआयएम तिरूचिरापल्‍ली येथील स्‍ट्रॅटेजिक मॅकक्‍वीन्‍स
  6. इंडियन स्‍कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथील आयएसबी_१०१

रिडिफाइन २०२४ बाबत अधिक माहितीसाठी भेट द्या – कमिन्‍स रिडिफाइन । कमिन्‍स इन्‍क आणि अधिक कमिन्‍स इंडियाला लिंक्‍डइनफेसबुकइन्‍स्‍टाग्राम आणि यूट्यूब वर फॉलो करा.