९वी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला २४ पासून विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजन
(२४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत विविध क्षेत्रातील वक्त्यांची व्याख्याने)
पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संत श्री ज्ञानेश्वर-संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने, युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होईल.
याचे उद्घाटन २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वा. उज्जैनचे आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता व संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. जगविख्यात संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड उपस्थित राहतील.
व्याख्यानमालेचा समारोप ३० नोव्हेंबर रोजी स. ११ वा.नवी दिल्ली येथील मौलाना आझाद नॅशनल उर्दु विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. फिरोज बख्त अहमद यांच्या प्रमुख उपस्थित होईल. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले, (सेवा निवृत्त) व्हीएसएम, एव्हीएसए, पीव्हीएसएम हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील.
२५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी ४ वा. होणार्या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे महामहोपाध्याय प्रा. सदाशिव द्विवेदी, (भारतीय ज्ञान परंपरा व विश्वशांती) व आयआयएसईआर चे प्राध्यापक प्रा.डॉ. रामकृष्ण भट (विज्ञान, अध्यात्म आणि धार्मिक ग्रंथांचे संघटन), मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख (विज्ञान आणि आध्यात्माचा सुसंवादः जागतिक शांततेसाठी आयकेएस आणि एनईपी २०२० चा मार्ग उजळणे), माजी मुख्य वनसंरक्षक व हभप रंगनाथ नाईकडे, सुप्रसिध्द अभिनेते श्री. सुरेंद्र पाल (द्रोणाचार्य – धर्म, नीती आणि कर्तव्य यांच्यातील संघर्षाचे प्रतिक) आणि यूजीसीचे माजी उप संचालक डॉ.भूषण पटवर्धन (जीनोम ते ओम) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच रोज स. ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होईल. यामध्ये प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, प्रसिद्ध लेखक डॉ. ज्ञानश्री लेले, रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी आर्यानंद, प्रसिद्ध संशोधक डॉ. निलेश ओक, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे, शिवम फाउंडेशनचे संस्थापक आचार्य श्री शिवम, भारत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीचे माजी अध्यक्ष पद्मश्री शेखर सेन, प्रा.डॉ. अक्षय मल्होत्रा, डॉ. श्रृती निरगुडकर, डॉ. ज्ञानदेव निलवर्णा, संकल्प संघई, प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, आणि शिव व्याख्याते नितिन बालगुडे इत्यादी विविध विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्ये आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी स. ७ ते ८ या वेळात योगासन वर्गाचे आयोजन क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा. मिलिंद पात्रे यांनी दिली.
ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.