तुमचे लिंक्डइन पेज तुमच्या व्यवसायाकरिता लाभदायी ठरण्यासाठी ५ टिप्स
व्यवसाय उभारणे हा एक महत्वपूर्ण पैलू आहे, तर व्यवसायाची ओळख निर्माण करणे दुसरां महत्वपूर्ण पैलू आहे. आजच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या डिजिटल विश्वामध्ये सर्व आकाराच्या कंपन्या दृश्यमानता, विश्वासार्हता आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. भारतातील १५० दशलक्षहून अधिक प्रोफेशनल्स आणि जगभरातील अब्जोहून अधिक प्रोफेशनल्स ब्रॅड्स, माहिती व संधींचा शोध घेण्यासाठी लिंक्डइनचा अवलंब करत असताना सुव्यवस्थित लिंक्डइन पेज व्यवसायांना जुडलेले राहण्यास आणि गोंधळलेल्या डिजिटल बाजारपेठेत वेगळे दिसण्यास मदत करू शकते.
लिंक्डइन इंडियाच्या मार्केटिंग सोल्यूशन्सचे संचालक सचिन शर्मा म्हणाले, ”तुमच्या कंपनीचे डिजिटल मुख्यालय म्हणून तुमच्या लिंक्डइन पेजचा विचार करा, जे जगभरातील प्रोफेशनल समुदायाला संधी देते. वर्दळीच्या मार्केटप्लेसमध्ये प्रमुख रिअल इस्टेटप्रमाणे उत्तमरित्या व्यवस्थापित पेज योग्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊन शकते, कार्यक्षमपणे तुमची उत्पादने व सेवा सादर करू शकते आणि तुमच्या व्यवसायासाठी नवीन विकास संधी निर्माण करू शकते. योग्य धोरण व सर्वोत्तम पद्धतींसह तुमचे लिंक्डइन पेज ब्रॅड विकास, सहयोग आणि व्यवसाय विस्तारीकरणासाठी प्रबळ स्रोत बनू शकते.”
जगभरातील ६९ दशलक्षहून अधिक कंपन्या व संस्था ब्रँडबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी लिंक्डइन पेजेसचा वापर करत आहेत. लिंक्डइन पेज डिझाइन करताना लक्षात असल्या पाहिजेत अशा ५ गोष्टी:
तुमच्या ब्रँडची ओळख सर्वांचे लक्ष वेधून घेईल याप्रमाणे पेज डिझाइन करा
उच्च दर्जाचा लोगो व कव्हर इमेज, सविस्तर पुनरावलोकनसह तुमचे पेज डिझाइन करा, ज्यामधून तुमच्या कंपनीचा उद्देश व व्यवसाय माहिती जसे तुमची वेबसाइट यूआरएल, लोकेशन, उद्योग व कंपनीचा आकार समजेल. संपूर्ण माहिती असलेल्या पेजेसना आठवड्याला ३० टक्क्यांहून अधिक व्ह्यूज मिळतात. तुमच्या ध्येयांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी यामध्ये सानुकूल कॉल-टू-अॅक्शन बटनची भर करा.
सातत्यपूर्ण, व्हिज्युअली सर्वसमावेशक कन्टेन्टच्या माध्यमातून तुमचे मत सादर करा
तुमच्या पोस्ट्समध्ये अद्वितीय इमेजेस् व व्हिडिओजची भर करत तुमच्या पेजला व्हिज्युअली लक्षवेधक बनवा. इमेजेसमुळे सामान्यतः कमेंट दर २ पट जास्त असतो आणि व्हिडिओ पोस्टना स्थिर व मजकूर पोस्टपेक्षा ५ पट जास्त प्रतिसाद मिळतो. हे व्हिज्युअल अॅसेट्स अधिक वैयक्तिकृत व संस्मरणीय असल्याने ते तुमच्या नेटवर्कमध्ये आणि त्यापलीकडे तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करण्यास देखील मदत करतात.
तुमच्या विद्यमान नेटवर्कचा उपयोग करत तुमचा समुदाय वाढवा
प्रबळ, व्यस्त फॉलोअर्सवर्ग तुमच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वाढीच्या संधी निर्माण करतो. तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम-पदवी प्रोफाइल कनेक्शन्सना तुमच्या लिंक्डइन पेजला फॉलो करण्यासाठी आवाहन करण्यास प्रेरित करा. तुमच्या पोस्ट आणि इव्हेंट्सना बूस्ट करून तुम्ही नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता.
संभाषणे सुरू करा आणि पुढे चालू ठेवा
कमेंट्सना प्रोत्साहन देणारे प्रश्न विचारल्याने विकासासाठी लाभदायी ठरू शकते आणि त्या कमेंट्सना प्रतिसाद दिल्याने विश्वास व निष्ठा वाढू शकते. कमेंट्सशी संवाद साधल्याने निदर्शनास येते की, तुमचे पेज कर्मचारी-संचालित गंतव्य आहे, ज्यामुळे तुमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या ब्रँडचे लोकशाहीकरण करण्यास मदत होते. अॅडमिन पेजवर दिसणाऱ्या कन्टेन्टव्यतिरिक्त इतर कन्टेन्टबाबत त्यांचा ब्रँड म्हणून कमेंट्सना प्रतिसाद देखील देऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या ब्रँड कौशल्यांचे अधिक लोकशाहीकरण होईल.
तुमचा ब्रँड घडवण्यामागील कर्मचाऱ्यांना प्रकाशझोतात आणा
व्यवसाय चालू ठेवणाऱ्या टीम सदस्यांना प्रकाशझोतात आणल्याने टीमचा सन्मान करण्याची तुमची संस्कृती निदर्शनास येते. कर्मचाऱ्यांची कामगिरी, पडद्यामागील मेहनत आणि टीम सेलिब्रेशन नियमितपणे सादर करा, ज्यामुळे तुमचे पेज व्यावसायिक समुदायाला सर्वोत्तम व यथायोग्य परिचय देईल. यामुळे तुमच्या कंपनी संस्कृतीमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत होते आणि तुमच्या नियोक्ता ब्रँडमध्ये अधिक मूल्याची भर होते.
तुम्ही लिंक्डइनवर डिझाइन करू शकणाऱ्या विविध प्रकारच्या पेजेसबाबत अधिक माहितीसाठी येथे (here) वाचा. तुम्ही तुमच्या लिंक्डइन पेज पोस्ट्सचे व्यवस्थापन करण्याबाबत अधिक माहिती येथे (here) मिळवू शकता.