पुणे : लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त 3 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये हृदयरोग,अस्थिरोग,बालरोग,स्त्रीरोग,मेंदूविकार,मुत्रपिंड विकार,नेत्ररोग,शस्त्रक्रिया आणि औषधशास्त्राशी निगडीत तज्ञांकडून मोफत सल्ला दिला जाणार आहे. बीएमआय (वजन,उंची),प्राथमिक तपासणी विनामूल्य असून नोंदणीकरिता 8886606060 या क्रमांकावर संपर्क साधावा.