पुणे: Amazon.in ने आज महाराष्ट्र आणि पुण्यातील त्यांच्या होम, किचन, आऊटडोर्स बिजनेसमधील वार्षिक 25% (वर्ष-दर-वर्ष) वाढ घोषित केली आहे, ज्यामुळे राज्यातील नवीन ग्राहकांमध्ये सुमारे 15% वाढ झाली आहे. या क्षेत्रात स्मार्ट होम, फिटनेस, सिक्युरिटी, किचन अप्लायंसेस आणि गार्डनिंग श्रेणीतील उत्पादनांना मोठी मागणी दिसून आली. महाराष्ट्रात, रॅकेट खेळांच्या मागणीत वाढ झाली आहे, बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटच्या विक्रीत अनुक्रमे 140% आणि 115% वार्षिक वाढ झाली आहे. दरम्यान, या क्षेत्रात क्रिकेट स्थानिक पसंतीचे ठरले असून क्रिकेट बॅटच्या विक्रीत वार्षिक 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
पुण्यात झालेल्या दिवसभर चालणाऱ्या या इव्हेंटमध्ये फर्निचर, घरगुती वापराच्या वस्तू, किचन आणि अप्लायंसेस, होम डेकोर आणि लाइटिंग, स्पोर्ट्स आणि फिटनेस, इलेक्ट्रिक व्हेइकल्स, ऑटो अॅक्सेसरीज, आउटडोर्स आणि गार्डनिंग आणि यांसारख्या बऱ्याच उत्पादनांचा समावेश होता. या अद्वितीय प्रदर्शनामुळे मीडिया आणि भागीदारांना ऍमेझॉन इंडियाच्या नेतृत्वाशी संवाद साधताना टॉप ब्रँड आणि उत्पादने अनुभवण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात ऍमेझॉनच्या इंटरेस्टिंग किचन फाइंड्स स्टोअरफ्रंटची सुद्धा सुरुवात झाली, जे होम आणि किचन श्रेणीतील अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण उत्पादने असलेले एक खास तयार केलेले ठिकाण आहे.
ऍमेझॉन इंडियाच्या किचन आणि आऊटडोर्सचे संचालक के.एन. श्रीनाथ म्हणाले, “पुण्यात ऍमेझॉन होम अँड किचन एक्सपिरिएन्स ऍरेना 2.0 ची सुरुवात करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. होम, किचन आणि आऊटडोर्स ऑनलाइन शॉपिंगकडे अधिकाधिक ग्राहक वळत असल्याने, आम्ही निरोगी, स्वच्छ आणि अधिक सोयीस्कर जीवनशैलीकडे एक मजबूत वळण म्हणून बघत आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र आणि पुण्यात वार्षिक दुहेरी अंकी वाढ होत आहे. Amazon.in वर, आम्ही उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांची विस्तृत निवड आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतींना पूर्ण करणाऱ्या उत्तम डील देऊन खरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत.”.
महाराष्ट्र आणि पुण्यात Amazon.in च्या लक्षात आलेले काही खरेदीचे प्रकार येथे देत आहेत:
टिकाऊ सोल्युशनसाठी वाढती मागणी: महाराष्ट्रातील ग्राहक टिकाऊ लिवींग सोल्युशन अवलंब वाढत्या प्रमाणात करत आहेत, राज्यभरात सौर पॅनेलच्या वापराची वाढ वार्षिक 110% पेक्षा जास्त आहे आणि पुण्यात त्याचा वापर वार्षिक 60% ने वाढत आहे.
अपग्रेटेड किचनसाठी वाढती मागणी: महाराष्ट्रात, ग्राहक त्यांच्या किचनला फारच उत्साहाने अपग्रेड करत आहेत, निरोगी आणि अधिक सोयीस्कर स्वयंपाक करण्याच्या पद्धती स्वीकारत आहेत. राज्यभर एअर फ्रायर्समध्ये वार्षिक 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि पुण्यात 60% ची वाढ झाली आहे. कॉफी मशीनची मागणी देखील वार्षिक 30% पेक्षा जास्त वाढली आहे, ज्यावरून ग्राहक प्रीमियम होम-ब्रिविंग अनुभवांना प्राधान्य देत आहेत असे लक्षात आले. याव्यतिरिक्त, किचनच्या नवकल्पकतेचा हब म्हणून उदयास येणाऱ्या पुण्यात कटिंग बोर्डमध्ये 120% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर पॉपकॉर्न मेकर्स आणि
किचन वेइंग मशीन्स सारख्या विशेष इलेक्ट्रिकमध्ये वार्षिक 30% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, ज्यामुळे
शहराची अन्नपदार्थांची आवड फार असल्याचे लक्षात येते. ग्राहक ऑटोमेटेड आणि स्मार्ट लिवींगकडे वळत आहेत: ग्राहक रोबोटिक व्हॅक्यूम आणि अॅक्सेसरीजसारख्या ऑटोमेटेड होम क्लीनिंग उत्पादनांकडे अपग्रेड होत आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रात वार्षिक 75% आणि पुण्यात वार्षिक 80% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, डिजिटल डोअर लॉक, व्हिडिओ डोअरबेल, सिक्युरिटी कॅमेरे यांसारख्या स्मार्ट सिक्युरिटी सोल्यूशन्सना मोठी मागणी दिसून येत आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात वार्षिक 55% वाढ झाली आहे.
उच्च दर्जाचे होम फर्निशींग आणि बाथरूम फिटींग्सचे वाढते प्राधान्य: फर्निचर आणि होम डेकोर या श्रेणीत पुण्याने वार्षिक 30% ची मोठी वाढ अनुभवली आहे. ऑफिससाठी खुर्च्या, गेमिंग खुर्च्या आणि अभ्यास डेस्कची मागणी 40% ने वाढली आहे, ज्यावरून कामाच्या ठिकाणी आरामदायीपणा ग्राहकांना हवा
असल्याचे लक्षात येत आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि पुण्यात बाथरूम अपग्रेड करण्याचा सुद्धा ट्रेंड वाढत आहे, राज्यभरात सिंक खरेदी 50% पेक्षा जास्त वाढली आहे. शिवाय, संपूर्ण प्रदेशात कमोडची विक्री अनुक्रमे 125% आणि 115% ने वाढली आहे. महाराष्ट्रातील अधिक ग्राहक घर सुधारणांसाठी ऍमेझॉनकडे वळत आहेत, ज्यामुळे हार्डवेअर खरेदीमध्ये 45% वार्षिक वाढ झाली आहे. अलिकडेच दरवाजे, प्लायवूड आणि बांधकाम साहित्याची भर पडल्याने घराचे नूतनीकरण आणखी सोपे होते. उन्हाळा सुरू होताच, घरातील तापमान कमी करण्यासाठीच्या उपकऱणांना जास्त मागणी आहे, महाराष्ट्रात कूलरमध्ये जवळजवळ 60% वार्षिक वाढ आणि पुण्यात 120% वार्षिक वाढ दिसून येत आहे. स्पोर्ट्स आणि फिटनेसमध्ये वाढती आवड: पुण्यात होम जिम सेटअपमध्ये वाढ झाली आहे, वजन आणि डंबेलच्या विक्रीत वार्षिक 40% वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, बऱ्याच ग्राहकांचे फिरायला जाण्याचे प्रयत्न
वाढल्याने त्यासाठी लागणाऱ्या कॅम्पिंग गियर खरेदीत वार्षिक 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
औद्योगिक उत्पादनांची वाढती मागणी: राज्यभरात Amazon.in वरून व्यावसायिक उत्पादने खरेदी करणाऱ्या व्यवसायांची आणि दुकानदारांची संख्या वाढत आहे, ज्यामुळे वार्षिक 40% वाढ झाली आहे. बाग सुंदर दिसण्यावर वाढती आवड: महाराष्ट्रात, बागकामासाठी पोर्टेबल सोल्यूशन्सचा वापर वार्षिक 165% दराने वाढत आहे, ज्यामध्ये स्ट्रिंग ट्रिमर 90% दराने वाढत आहेत, तर पुणे जिल्हा या क्षेत्रात 310% पेक्षा mजास्त वार्षिक वाढीसह आघाडीवर आहे, ज्यामुळे मोबाईल गार्डन टूल्सकडे वळले असल्याचे लक्षात येत आहे. राज्यात गार्डन अॅक्सेसरीजमध्ये 60% वार्षिक वाढ झाली आहे तर पुण्यात पाँड, प्लांटर्स आणि स्टोरेज सोल्यूशन्सच्या वाढत्या मागणीमुळे 65% वार्षिक वाढ झालेली आहे, ज्यामुळे पुण्याचे स्टायलिश आणि फंक्शनल आऊटडोर्स जागांवर भर देत असल्याचे लक्षात येते.