पुणे: गीत-संगीताने नटलेल्या ‘सुरेल पहाट’ या सांगीतिक मैफलीने गुढीपाडव्याची प्रसन्न सुरुवात होणार आहे. येत्या रविवारी (ता. ३०) पहाटे ६ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुणेकरांना ही पर्वणी अनुभवता येणार आहे. पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व गायिका मनीषा निश्चल यांच्या स्वरांचा नजराणा पेश होणार आहे.
 
गेट सेट गो हॉलिडेज, पूना गेस्ट हाऊस यांच्या वतीने मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत ‘सुरेल पहाट’चे आयोजन केले आहे. विघ्नेश जोशी यांचे ओघवते निवेदन, तर अमर ओक, सत्यजित प्रभू, डॉ. राजेंद्र दूरकर, अभिजित भदे आणि विनायक नेटके यांच्या वाद्यांवर साथसंगत असणार आहे.