मुंबई: कोटक प्रायव्हेट बँकिंग* या कोटक महिंद्रा बँक लि. (”बँक”)च्या विभागाने आपला बहुप्रतिक्षित ‘टॉप ऑफ द पिरॅमिड (टीओपी) रिपोर्ट’चे नवीन एडिशन लाँच केले आहे. हे एडिशन कोटक प्रायव्हेट बँकिंगच्या २०व्या वर्धापन दिनाला साजरे करते, तसेच भारतातील अल्ट्रा-नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्सना (अल्ट्रा-एचएनआय) सर्वांगीण आर्थिक सोल्यूशन्स देते.
नवीन कोटक प्रायव्हेट टीओपी रिपोर्ट भारतातील अल्ट्रा-एचएनआयच्या खर्च व गुंतवणूकीच्या पद्धती, तसेच आर्थिक सूचकांबाबत सखोल माहिती देतो. हा अहवाल त्यांच्या जीवनशैली निवडी, प्रेरणास्रोत आणि महत्त्वाकांक्षांना प्रकाशझोतात आणतो. मालमत्ता निर्मिती व्यतिरिक्त हा अहवाल या व्यक्तींच्या सखोल, अधिक अर्थपूर्ण प्रवासाचा उलगडा करतो, जो त्यांच्या जीवनात उद्देश व समाधान आणतो.
अल्ट्रा-एचएनआयचे दीर्घकाळापासून सहयोगी आणि क्लायण्ट्सना त्यांच्या उद्देशाची पूर्तता करण्यास मदत करण्याच्या तत्त्वासह कोटक प्रायव्हेट बँकिंग महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देते, ज्यामुळे हा अहवाल भारतातील वाढत्या श्रीमंतवर्गासाठी अद्वितीय व आदर्श आहे. अर्न्स्ट अँड यंग एलएलपी^ (ईवाय)कडे नियुक्त केलेल्या कोटक प्रायव्हेटच्या टीओपी अहवालात भारतातील १५० श्रीमंत व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या निवडींमधील काही नवीन ट्रेण्ड्स, तसेच लक्झरीमध्ये जागतिक गुंतवणूकदार म्हणून त्यांची विकसित होत असलेली भूमिका आणि उदयोन्मुख डिजिटल ट्रेण्ड्स यांचा समावेश आहे.
कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या कोटक प्रायव्हेट बँकिंगचे सीईओ ओईशर्य दास म्हणाले, ”कोटक प्रायव्हेटचा टीओपी रिपोर्ट भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या बारकाव्यांबद्दल समजून घेण्यासाठी बहुमूल्य संसाधन आहे. भारतातील आर्थिक लँडस्केप विकसित होत असताना आमचा अहवाल अल्ट्रा-एचएनआय त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणत आहे आणि देशांतर्गत व जागतिक मालमत्ता स्वीकारत आहे, ज्यामुळे २०२८ पर्यंत त्यांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या वर्षीचे एडिशन विशेषतः महत्त्वाचे आहे, जेथे हे एडिशन त्यांच्या आर्थिक निर्णयांना कॅप्चर करण्यासोबत त्यांचे जीवनशैली प्राधान्यक्रम आणि कौटुंबिक व्यवसायांच्या* आणि इस्टेट नियोजनाच्या* गतिशीलतेबाबत सखोल माहिती देखील देते, ज्यामधून त्यांची सर्वसमावेशक जीवनशैली निदर्शनास येते.”
ईवाय इंडियाच्या वेल्थ अँड अॅस्सेट मॅनेजमेंटचे भागीदार सौरभ जोशी म्हणाले, ”कोटक प्रायव्हेटचा टीओपी अहवाल सर्वेक्षण निकाल आणि भारतातील १५० अल्ट्रा-एचएनआयच्या विश्लेषणासह तयार करण्यात आला आहे. देशांतर्गत आर्थिक वाढीची अपेक्षा आणि खाजगी संपत्तीतील वाढ अल्ट्रा-एचएनआयच्या महत्त्वाकांक्षा व गुंतवणूकीबाबत असलेल्या समजामधून दिसून येतात. भारतातील अल्ट्रा-एचएनआय विविध घटकांमधून प्रेरित होत देशाबाहेर जागतिक ओळख निर्माण करत आहेत. अल्ट्रा-एचएनआय विभागाला प्राधान्य देण्याची गरज आहे, ज्यामध्ये गतीशील विकास, सर्वसमावेशक गरजा आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीचे व्यवस्थापन व जतन कसे केले जाते यासंदर्भातील परिवर्तनात्मक बदल दिसून येतो.”
प्रमुख निष्पत्ती:
· भारतातील अल्ट्रा–एचएनआयमध्ये प्रबळ आर्थिक घडामोडींमुळे आयपीओ वाढीला चालना मिळाली आहे*: o २०२३ च्या अखेरीस आणि २०२४ मध्ये प्रबळ आर्थिक क्रियाकलाप आणि सकारात्मक गुंतवणूकदारांच्या भावनांमुळे निधी संकलनात वाढ झाली, जेथे १४ टक्के अल्ट्रा-एचएनआयचे मत आहे की, त्यांच्या प्राथमिक व्यवसायाची विक्री त्यांच्या संपत्तीचा स्रोत आहे. o २०२४ मध्ये २६८ आयपीओसह भारत जागतिक स्तरावर आघाडीवर होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि जागतिक आयपीओ मार्केट शेअर ३० टक्क्यांपर्यंत वाढले, तसेच एमअँडए आणि पीई/व्हीसी क्रियाकलापांमध्ये घट झाली. गुंतवणूकदारांनी स्पष्ट निर्गमन धोरणांसह शाश्वत व्यवसाय योजनांवर लक्ष केंद्रित केले. · पसंतीचा मालमत्ता वर्ग म्हणून इक्विटीने चमकदार कामगिरी केली: अल्ट्रा-एचएनआय त्यांच्या गुंतवणुकीपैकी ३२ टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये करतात, ज्यामध्ये ८९ टक्के वैयक्तिक स्टॉकला प्राधान्य देतात. विशेषतः अमेरिकेत जागतिक इक्विटीजना अधिक प्राधान्य मिळत आहे. · महामारीनंतरचे बदल: आरोग्य आणि स्वास्थ्यावरील खर्चाला अधिक प्राधान्य: महामारीनंतर, अल्ट्रा-एचएनआय सर्वसमावेशक स्वास्थ्याला अधिक प्राधान्य देत आहेत, ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्ती हा खर्च आवश्यक मानतात. ते त्यांच्या बजेटपैकी १० टक्के आरोग्य आणि स्वास्थ्याकरिता खर्च करतात, तर ८१ टक्के व्यक्ती प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जीवनशैलीतील बदलांवर खर्च करतात. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेलनेस ट्रॅव्हलमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये उत्तराखंड आणि केरळ यासारखी गंतव्ये लोकप्रिय आहेत. याव्यतिरिक्त, अल्ट्रा-एचएनआय होम फिटनेस सोल्यूशन्स आणि आरोग्यदायी आहारांमध्ये गुंतवणूक करत आहेत. विश्रांतीसाठी परदेशी प्रवास देखील महत्त्वपूर्ण आहे, ७ टक्के खर्च त्यासाठी केला जात आहे आणि लक्झरी, विशेष अनुभवांना जास्त मागणी आहे. · संग्रहणीय वस्तूंचे मोहक विश्व*: अल्ट्रा-एचएनआयसाठी संग्रहणीय वस्तू महत्त्वाची आवड आहे, ज्यामध्ये वैयक्तिक आवड, सांस्कृतिक प्रशंसा आणि धोरणात्मक गुंतवणूक यांचा समावेश आहे. संग्रहणीय वस्तूंमध्ये दागिने, ललित कला, विंटेज वाइन, क्लासिक ऑटोमोबाइल, दुर्मिळ नाणी, स्टॅम्प, लक्झरी बॅग्ज आणि एनएफटी यांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, ९४ टक्के अल्ट्रा-एचएनआयकडे दागिने आहेत, ७३ टक्के कलेला प्राधान्य देतात आणि क्रिप्टोकरण्सीच्या# तुलनेत एनएफटीला# अधिक प्राधान्य दिले जात आहे, २४ टक्के डिजिटल मालमत्ता खरेदीची योजना आखत आहेत#. · जास्त उत्पन्नामुळे अल्ट्रा–एचएनआयमध्ये व्यावसायिक रिअल इस्टेट आवडते बनले आहे*: ४५ टक्के अल्ट्रा-एचएनआयसाठी व्यावसायिक रिअल इस्टेट सर्वोच्च मालमत्ता निवड आहे, जी निवासी रिअल इस्टेटसाठी ३३ टक्क्यांच्या तुलनेत जास्त उत्पन्न आणि उत्तम भाडे देते. · अल्ट्रा–एचएनआयसाठी उत्तराधिकार नियोजनाची कला – |