कोंढवा अवैध कचरा डम्पिंग प्रकरण ; कचरा साठवणुकीमुळे कोंढव्यातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका…
मनपा घनकचरा व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत काय? उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही पायमल्ली…
पुणे ( सम्राट सिंह) : शहरातील कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानावर अवैधरित्या डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठविण्यात येत असल्या कारणाने परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे पुणे मनपा प्रशासनाच्या घनकचरा विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या प्रकरणी नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. या प्रकरणी कुंभकर्णी झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाने या ठिकाणी असलेला कचरा लवकर न हटवल्यास नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची खात्रिलायक माहिती प्राप्त झाली आहे.
कोंढवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानाचा वापर गेल्या अनेक दिवसांपसासून कचरा हस्तांतरणासाठी केला जात होता. लहान गाड्यांमधून आणलेला कचरा हा मोठ्या गाड्यांमध्ये टाकण्याचे काम या ठिकाणी केले जात होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी लहान गाड्या येऊन चक्क गाडीमधील कचरा ग्राउंडवरच टाकून जात आहेत. या प्रकारामुळे या मैदानावर आज एक अवैधरित्या तयार करण्यात आलेले कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड तयार झालेले आहे. अनेक दिवसांपासून कचरा या ठिकाणी पडून असल्यामुळे त्याची भयंकर अशी दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत आहे. या घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गंभीर प्रकाराकडे उपायुक्त महापालिका घनकचरा व्यवस्थापन कार्यालय पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तात्काळ कारवाई करून हा कचरा गरजेचे आहे. असे न झाल्यास आगामी काळात परिसरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराच्या वाहनांची रात्रभर पार्किंग…
कचरा उचलण्यासाठी पुणे महापालिकेने एका ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्यांच्या सर्व गाड्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे अवैध रित्या कोणतेही परवानगी नसताना त्या ठिकाणी पार्किंग होत आहेत.
खाजगी ठेकेदाराच्या विना परवाना पार्किंग केली जाते. कोणाच्या वरदहस्ताने केली जाते. काही पुणे महापालिकेचे लोक थोड्या मोबदल्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही पायमल्ली…
कचरा साठवणुकीमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांच्या वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारे कचरा साठवणूक करू नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आहेत. परंतु कोंढवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उच्च न्यायालयाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली होते आहे. महापालिका प्रशासन एकीकडे कुंभकर्णी झोपेत आहे, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या होणाऱ्या पायमल्लीचीदेखील मनपा प्रशासनाला जाणीव नसल्याचे दिसून येत आहे.