त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन
पुणे : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) ‘नेक्सस 2026’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा वार्षिक महोत्सव तीन ते नऊ जानेवारी 2026 दरम्यान आयोजित केला आहे. या महात्सवात विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, बुद्धीमत्ता आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी यंदाची संकल्पना ‘सिनेव्हर्स’ ही असून सिनेजगतापासून प्रेरणा घेत बीएनसीएचा परिसर हा त्या दृष्टीने सांस्कृतिक अनुभूती देईल असा सजवण्यात आला आहे.
या वार्षिक महोत्सवातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये फ्ली मार्केट उर्फ सिनेबाजार आयोजित केले असून ते फक्त 7 जानेवारी रोजी सर्वांसाठी सशुल्क खुले करण्यात आले आहे. त्यामध्ये 40 स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यावर विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, हस्तकला, जीवनोपयोगी वस्तू, तांत्रिक उपकरणे, खाद्यपदार्थ आणि विद्यार्थिनींमधील उद्योजगतेच्या कौशल्यातून निर्माण झालेली उत्पादने ठेवण्यात येणार आहेत. या माध्यमातून एक जिवंत सामाजिक जाणीव निर्माण करत असतानाच महोत्सवात स्थानिकांच्या सक्रिय सहभागातून त्यांच्यातील सर्जनशीलता तसेच सांस्कृतिक आदान-प्रदानातील सुसंवाद हा या महोत्सवातला एक पैलू ठरणार आहे.
याशिवाय ‘नेक्सस 2026’ मध्ये ‘बीएनसीए’मधील पदवीपूर्व आणि पदव्यूत्तर तसेच पदवीपूर्व डिझाईन अभ्यासक्रमातील (बी डीइएस) या विद्यार्थिनींनी साकारलेली असंख्य शैक्षणिक कामेही प्रदर्शित करण्यात येत आहेत. पाच जानेवारी रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते संपन्न होत आहे. त्यावेळी प्रदर्शनाला पुणे विभागातील आर्किटेक्चर महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक भेट देणार आहेत.
याशिवाय महोत्सवातील आंतरमहाविद्यालयीन टॉर्क-व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे संघ एकत्र आणले जातील. टॉर्क-क्रीडा स्पर्धा तीन ते पाच जानेवारी दरम्यान होत असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती, सांघिक भावना आणि निरोगी स्पर्धात्मक वृत्ती जोपासली जावी असे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यातून क्रीडा विश्वातील एक जिवंत अनुभव मिळावा असा या महोत्सवामागील हेतू आहे. याशिवाय या महोत्सवातील प्रत्येक संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, कार्यशाळा, प्रदर्शने, स्पर्धा, क्रीडा यांचे आयोजन विद्यार्थिनींच्या पुढाकारातून करताना बीएनसीएच्या सर्वव्यापी शैक्षणिक व अकादमीक विश्वा पलीकडील वचनबद्धता प्रत्ययाला येईल.
सोबत प्रदर्शनाची पूर्व तयारी चालू असतानाचे छायाचित्र जोडले आहे.
