बँकेच्या ज्येष्ठ ग्राहकांसाठी तयार केलेला एक अनन्यसाधारण आणि अविस्मरणीय अनुभव

दिल्ली: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या ॲक्सिस बँकेने, बँकेच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी म्हणून खास  ‘फ्लॅशबॅक’ मोहीम तयार केली आहे. या अनोख्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ॲक्सिस बँकेने आपल्या ज्येष्ठ ग्राहकांसाठी जुन्या काळातील काही अप्रतिम चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित केले. या माध्यमातून आपल्या ज्येष्ठ ग्राहकांशी संवाद साधण्याचे आणि त्यांना जोडण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे, बँकेने या ज्येष्ठांना ६० आणि ७० च्या दशकातील कालातीत चित्रपट पाहण्याचा आनंद दिला. यंदा या उपक्रमात त्या त्या राज्यांसाठी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट दाखवण्यात आले. यात कन्नड, तेलगू, मल्याळम आणि तमिळ अशा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा समावेश होता. यामुळे स्थानिकांशी  अधिक सखोल सांस्कृतिक बंध निर्माण झाला.

दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, लुधियाना, जयपूर, लखनौ, चंदीगड, पाटणा, रांची, वडोदरा, इंदूर, नागपूर, सुरत, कोची, मंगलोर, कोईम्बतूर आणि डेहराडून या 22 शहरांमध्ये हे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. अमर अकबर अँथनी (हिंदी), चुपके चुपके (हिंदी), गंधडा गुडी (कन्नड), मायाबाजार (तेलुगू), मनिचित्रथाझू (मल्याळम) आणि मुथल मरियथाई (तामिळ) यासारख्या सर्वकालीन लोकप्रिय चित्रपटांसाठी बँकेने पीव्हीआर, सेनको, व्हाइब्स आणि मर्झी सोबत भागीदारी केली होती. 

ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुप मनोहर म्हणाले, “आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाणारी नाती निर्माण करणे आणि ती जपणे फार महत्त्वाचे असते असे आम्हाला वाटते, आणि यावर आमचा ठाम विश्वास आहे. आमच्या ‘दिल से ओपन’ या ब्रँड तत्त्वज्ञानाशी प्रामाणिक राहून, आमच्या ग्राहकांनी अनेक वर्षांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही ‘फ्लॅशबॅक’ हा उपक्रम राबवला. हा उपक्रम म्हणजे त्यांच्याशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. या उपक्रमाद्वारे, हे बंध अधिक दृढ करण्याचा आणि त्यांच्यासोबत केलेल्या प्रवासाचा आनंद साजरा करण्याचा आमचा मानस आहे. कालातीत अभिजात कलाकृतींच्या माध्यमातून गोड आठवणींना उजाळा देऊन, आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी एक नॉस्टॅल्जिक आणि आनंददायक अनुभव निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे.”

आपल्या ज्येष्ठ ग्राहकांचा सन्मान करण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची ऍक्सिस बँकेची वचनबद्धता या उपक्रमातून अधोरेखित होते. तसेच आपल्या काळातील चित्रपटांच्या माध्यमातून ग्राहकांना देखील आपण विशेष आणि महत्त्वाचे असल्यासारखे वाटते.