पुणे: आयसीआयसीआय बँकेने पुण्यातील बाणेर रोडवर एक कॉर्पोरेट इकोसिस्टम शाखा सुरू केली आहे. या शाखेत 24 तास एटीएमची सोय आहे.कॉर्पोरेट्स आणि त्यांची इकोसिस्टमज्यात प्रवर्तककर्मचारीविक्रेते आणि चॅनल भागीदार यांचा समावेश आहे – त्यांना ही शाखा 360-अंश बँकिंग सोल्यूशन्स प्रदान करतेज्यामुळे बँकिंग गरजांची पूर्तता अखंड आणि कार्यक्षमतेने होते. ही शाखा वित्तीय सेवाआयटी/आयटीईएसऔषध निर्माणऑटोमोबाइलरिअल इस्टेटवस्त्रोद्योगपोलाद आणि शिक्षण यासह 15 हून अधिक प्रमुख उद्योगांमधील कंपन्यांना डिजिटल बँकिंगद्वारे सेवा देते. संपूर्ण सेवा देणारी इकोसिस्टम शाखा म्हणूनही याचे काम सुरू आहे. बँकेच्या सगळ्या सेवा देण्यासाठी आपापल्या कामात पारंगत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पाठबळ आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) माजी महासंचालक डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर; सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर; पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेडचे ​​संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे; आणि चितळे बंधूचे व्यवस्थापकीय भागीदार श्री. इंद्रनील चितळे या मान्यवरांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले.

बँकिंग सोल्यूशन्सचा भाग म्हणून, ही शाखा आपल्या कॉर्पोरेट आणि व्यावसायिक बँकिंग ग्राहकांना आयात-निर्यात व्यवहार, लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी यांसारख्या सेवा प्रदान करते. याव्यतिरिक्त, बचत आणि चालू खाते, सॅलरी अकाउंट, डीमॅट आणि ट्रेडिंग खाती, मुदत ठेवी आणि रिकरिंग ठेवी, तसेच व्यवसाय कर्ज, शिक्षण कर्ज, सुवर्ण कर्ज, गृह कर्ज, मालमत्तेवर कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज अशी विविध कर्जे आणि विविध प्रकारची खाती तसेच ठेवींची सोय उपलब्ध करून देते. एनआरआय, व्यापार आणि फॉरेक्स सेवांसोबतच ही शाखा कार्ड सेवा देखील प्रदान करते. याव्यतिरिक्त, ही शाखा संपत्तीचे व्यवस्थापन, ट्रस्टची स्थापना आणि कौटुंबिक कार्यालये यांसारख्या खासगी बँकिंग सेवा देखील उपलब्ध करून देते.

सोमवार ते शुक्रवारसह महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 9:30 ते दुपारी 3 पर्यंत ही ब्रँच सुरू राहील.

ही शाखा टॅब बँकिंग सुविधा देखील देते, ज्यामुळे ग्राहकांच्या घरी जाऊन कर्मचारी टॅब्लेटच्या मदतीने जवळपास 100 सेवा देऊ शकतो. यात खाते उघडणे आणि मुदत ठेव (FD) सुरू करणे, चेकबुकसाठी विनंती करणे, ई-स्टेटमेंट तयार करणे आणि पत्ता बदलणे आदींचा समावेश आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या महाराष्ट्रात 890 पेक्षा जास्त शाखा आणि 1690 पेक्षा जास्त एटीएम तसेच कॅश रिसायकलिंग मशीन्स (सीआरएम) आहेत.

शाखा, एटीएम, कॉल सेंटर्स, इंटरनेट बँकिंग (www.icici.bank.in) आणि मोबाइल बँकिंगच्या मल्टी-चॅनल वितरण नेटवर्कद्वारे आयसीआयसीआय बँक आपल्या सर्व ग्राहकांना उत्तम सेवा देते.

शाखेचा पत्ता पुढीलप्रमाणे:

आयसीआयसीआय बँक लि.,

शोरूम नं: 1 & 2,

बिल्डिंग: आयजी कॅपिटल,

सीरियल नं.: 3/7,

बाणेर रोड,

पुणे – 411045