पूर्व भागात आजची दिवाळी पहाट म्हणजे सर्वधर्मियांची दिवाळी ही संकल्पना माजी राज्यमंत्री व ग्रंथालय अध्यक्ष
बाळासाहेब शिवरकर आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व ग्रंथालय कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी अथक
परिश्रमाने साकारली
सिद्धार्थ ग्रंथालय, पुणे यांचे वतीने आयोजित ;दिवाळी पाडवा पहाट व वर्षभर दिवाळी अंक शुभारंभ ; प्रसंगी राणी
लक्ष्मीबाई उद्यानातील संगीत समारंभात पूर्व भागात भारतीय संस्कृतीचे केलेले जतन ही पुणेकरांना व कॅम्प परिसरातील
नागरिकांना अभिमानास्पद घटना असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले
या कार्यक्रमास पुणे कॅन्टोन्मेन्ट मतदार संघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे विधान परिषदेचे माजी आमदार उल्हास
पवार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, पुणे कॅन्टोन्मेंट सह बँकेचे संचालक पोपट गायकवाड संजय फटके माजी
संचालक शांताराम चौधरी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम पुणे कॅन्टोन्मेंट शांतता कमिटी सदस्य
सामाजिक कार्यकर्ते तसेच पुणे शहर व कॅम्प परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी विधान परिषदेचे
माजी आमदार प्रकाश देवळे प्रतिशिर्डी विश्वस्त सपना लालचंदानी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नियुक्त उपाध्यक्ष सचिन मथुरावाला
यांनी शुभेच्छा दिल्या
पूर्व भागातील सर्वधर्मियांना संगीताच्या माध्यमातून श्रवणीय मराठी हिंदी गाणी गझल लावणी देशभक्तीपर गीतांच्या
माध्यमातून खिळवून ठेवल्याची भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली तारा पूर्व भागात असा कार्यक्रम गेली अनेक वर्षे केला जात
असल्याबद्दल लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आयोजकांचे कौतुक केले.
एस एम इव्हेंट्स प्रस्तुत सुप्रसिद्ध संगीतकार व पार्श्वगायक राहुल घोरपडे स्वरप्रिया बेहेरे भाग्यश्री अभ्यंकर हेमंत
वाळुंजकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने दिवाळीची पहाट गाजविली तसेच लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अशोक कदम यांनी ;विठू माउली ; हे गीत सादर केले
सुरेल संगीत साथसंगीत व सप्तसुरांचा उत्तम मेळ आनंद अनुभवायला उपस्थितांना मिळाला विविध मराठी-हिंदी गीते
भावगीते तसेच भजन सादर केल्यानंतर रसिकांची दाद मिळविली त्यामध्ये देहाची तिजोरी या गाण्याने सुरुवात करून
भारतवर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ये मेरे वतनके लोगो या गाण्याने मैफिलीची सांगता झाली
कार्यक्रमासाठी साथसंगत विजय उपाध्ये नीलेश श्रीखंडे विलास क्षीरसागर मंदार देव यांनी केली तर निवेदन सुमेधा
दफ्तरदार यांनी केले साउंड व्यवस्था संजय बेंद्रे यांनी सांभाळली
तसेच ;फक्त रु ४५०/- मध्ये वर्षभर दिवाळी अंक वाचा ; या योजनेचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात
आला
यानिमित्ताने राणी लक्ष्मीबाई गार्डन रंगीबेरंगी विद्युत रोषणाई व रांगोळीने खास सुशोभित करण्यात आले होते
कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी आभार मानले
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गायक आणि मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थितांनी
दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला।
विश्वनाथ सातपुते, कार्यवाह