नवी दिल्ली: सॅमसंग इंडियाने त्यांची प्रमुख तरूण शिक्षण व इनोव्हेशन स्पर्धा ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ २०२४ च्या तिसऱ्या पर्वासाठी विजेत्या टीम्स – इको टेक इनोव्हेटर आणि मेटल यांची घोषणा केली. गोलाघाट, आसाम येथील इको टेक इनोव्हेटरला स्कूल ट्रॅकमध्ये कम्युनिटी चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले, तर उडुपी, कर्नाटक येथील मेटलला युथ ट्रॅकमध्ये एन्व्हारोन्मेंट चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले. यामधून भारतातील प्रमुख शहरांबाहेर या उपक्रमाची पोहोच दिसून आली.
शुद्ध पिण्यायोग्य पाणी समान उपलब्ध होण्यासंदर्भात संकल्पना विकसित केलेल्या इको टेक इनोव्हेटरला प्रोटोटाइप सुधारणेसाठी २५ लाख रूपयांचे सीड अनुदान मिळाले आणि भूजलामधील आर्सेनिक काढून टाकण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेल्या मेटलला आयआयटी-दिल्ली येथे इनक्युबेशनसाठी ५० लाख रूपयांचे अनुदान मिळाले. समसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क आणि भारतातील युनायटेड नेशन्स रेसिडण्ट कोऑर्डिनेटर शॉम्बी शार्प यांच्या हस्ते या टीम्सचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देत सन्मान करण्यात आला.
याव्यतिरिक्त, ‘कम्युनिटी चॅम्पियन’च्या स्कूलला शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी आणि समस्या-निवारण मानसिकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग उत्पादने देखील मिळतील, जसे स्मार्ट डिस्प्ले फ्लिप ७५ इंच, फ्रीस्टाइल प्रोजेक्टर आणि १० गॅलॅक्सी टॅब एस१०+ डिवाईसेस. तसेच, ‘एन्व्हायरोन्मेंट चॅम्पियन’च्या कॉलेजला सामाजिक उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्मार्ट डिस्प्ले फ्लिप ७५ इंच, फ्रीस्टाइल प्रोजेक्टर आणि १० गॅलॅक्सी बुक ४ प्रो लॅपटॉप्स मिळतील.
१० टीम्सना प्रत्येकी १ लाख रूपये मिळाले, तर सर्व सदस्यांचा प्रमाणपत्रांसह गौरव करण्यात आला. तसेच, स्कूल ट्रॅकमधील सहभागींना गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा मिळाले, तर युथ ट्रॅकमधील सहभागींना गॅलॅक्सी झेड फ्लिप६ मिळाले. प्रमुख सीएसआर उपक्रम ‘सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो’चा देशातील तरूणांना वास्तविक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यास आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसह व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
”सॅमसंगमध्ये आम्हाला ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ यंदाच्या एडिशनमध्ये सर्व सहभागींनी दाखवलेली नाविन्यता आणि सर्जनशीलतेचा अत्यंत अभिमान वाटतो. आमच्या प्रमुख सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून आमचा तरूणांना त्यांचे समुदाय व पर्यावरणामध्ये काही मोठ्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स, मार्गदर्शन व संधी देत सक्षम करण्याचा मनसुबा आहे. इको टेक इनोव्हेटर आणि मेटल यांच्या यशामधून तंत्रज्ञान व नाविन्यतेच्या माध्यमातून अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्याप्रती भावी पिढीची क्षमता दिसून येते. आम्ही या तरूण इनोव्हेटर्सच्या संकल्पनांना प्रत्यक्षात येताना आणि दीर्घकालीन बदल घडवून आणताना पाहण्यास उत्सुक आहोत,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.
”या तरूण इनोव्हेटर्सना त्यांच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर निपुण करण्यासाठी सॅमसंगसोबत सहयोग करण्यास अत्यंत सन्माननीय वाटत आहे. आमच्या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यासोबत अत्याधुनिक संसाधने उपलब्ध करून दिली आहेत, ज्यांनी सहभागींमध्ये त्यांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्मविश्वास जागृत केला, तसेच त्यांना सक्षम केले. आम्हाला टीम इको टेक इनोव्हेटर आणि मेटलने केलेली अविश्वसनीय प्रगती पाहताना अभिमान वाटत आहे. तसेच आम्हाला विश्वास आहे की, त्यांचे सोल्यूशन्स समाज व पर्यावरणाप्रती अर्थपूर्ण योगदान देतील,” असे आयआयटी दिल्लीमधील एफआयटीटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले.
”जगभरातील प्रमुख न्यूयॉर्कमधील यूएन समिट ऑफ द फ्यूचरमध्ये एकत्र आले आणि त्यांनी एसडीजी व आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. सॉल्व्ह फॉर टूमारो उपक्रम तरूण सहभागाला चालना देतो, जेथे त्यांना आपल्याला गरज असलेली सोल्यूशन-केंद्रित नाविन्यता आणि सर्जनशील विचारसरणी अनलॉक करण्याचे आवाहन करतो. टीम इको टेक इनोव्हेटर आणि मेटल यांच्या यशामधून तरूणांना योग्य कौशल्ये, संसाधने व नाविन्यता आणण्याकरिता प्लॅटफॉर्म्ससह सुसज्ज केल्यास संपादित होऊ शकणारी मोठी उपलब्धी दिसून येते. आम्ही नाविन्यतेच्या या संस्कृतीला चालना देण्यासठी सॅमसंगचे आभार मानतो, तसेच विजेत्यांचे त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी अभिनंदन करतो,” असे भारतातील युनायटेड नेशन्स रेसिडण्ट कोऑर्डिनेटर शॉम्बी शार्प म्हणाले.
२२ विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व असलेल्या टॉप १० टीम्स ग्रँड फिनालेसाठी निवडण्यात आल्या, ज्यांनी ग्रँड ज्यूरीसमोर त्यांच्या संकल्पना सादर केल्या आणि त्यांचे प्रोटोटाइप्स दाखवले. ग्रँड ज्यूरीमध्ये सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, बेंगळुरूचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. मोहन राव गोली, आयआयटी-दिल्ली येथील डिझाइन विभागाचे असिस्टण्ट प्रोफेसर डॉ. श्रीनिवासन वेंकटरामण, भारत सरकारसाठी प्रिन्सिपल सायण्टिफिक अॅडवायजरच्या कार्यालयामधील स्ट्रॅटेजिक अलायन्सेसच्या संचालक डॉ. सपना पोती आणि सायण्टिटीस्ट ‘जी’ व मिनिस्ट्री ऑफ इलेर्क्टॉनिक्स अँड आयटी (एमईआयटीवाय) येथील आरअँडडीच्या ग्रुप कोऑर्डिनेटर श्रीमती सुनिता वर्मा यांचा समावेश होता.
ग्रँड फिनालेच्या सुरूवातीला पिच इव्हेण्टचे आयोजन करण्यात आले, ज्यानंतर पुरस्कार सोहळा सुरू झाला. सॅमसंगमधील टॉप कार्यकारी व कर्मचाऱ्यांनी या इव्हेण्टला उपस्थिती दाखवली, तसेच ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’च्या पूर्वीच्या एडिशन्सचे विजेते, ग्रँड ज्यूरी सदस्य व १० टीम्सचे मेन्टोर्स आणि एफआयटीटी, आयआयटी दिल्ली, एमईआयटीवाय व युनायटेड नेशन्स इन इंडियामधील प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दोन व्यापक थीम्स: ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ आणि ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी’ अंतर्गत त्यांच्या संकल्पनांना सबमिट केले. युथ ट्रॅकने या व्यापक थीम्सअंतर्गत संकल्पना सबमिट केल्या, पण बहुतांश संकल्पना वंचित समुदायांसाठी शिक्षण व संसाधन उपलब्धता, प्रायोगिक अध्ययनामधील आव्हाने, डिजिटल साक्षरता, जल संवर्धन आणि आर्सेनिक प्रदूषण अशा प्रमुख समस्यांवर केंद्रित होत्या.
इव्हेण्टमध्ये प्रमुख बक्षीसांव्यतिरिक्त समारोहादरम्यान दोन विशेष पुरस्कार देखील देण्यात आले, ‘सोशल मीडिया चॅम्पियन अवॉर्ड’ आणि ‘गुडविल अवॉर्ड’. स्कूल ट्रॅकमधील प्रीएटर व्हीआर आणि युथ ट्रॅकमधील बायोडी यांना गुडविल अवॉर्ड्ससह पुरस्कारित करण्यात आले, जेथे या पुरस्काराने प्रेक्षकांच्या पसंतीच्या विजेत्यांना सन्मानित केले. दोन्ही टीम्सना रोख बक्षीस म्हणून १ लाख रूपये मिळाले. तसेच, स्कूल ट्रॅकमधील यू आणि युथ ट्रॅकमधील एन्व्हटेकने ‘सोशल मीडिया चॅम्पियन अवॉर्ड’ जिंकला. या अवॉर्डने टीम्सच्या सोशल मीडियाप्रती योगदानाला सन्मानित करण्यासोबत प्रत्येकी ५०,००० रूपयांचे अनुदान दिले.
यंदा, २०२२ ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ विजेते शंकर श्रीनिवास यांना त्यांचे नाविन्यपूर्ण ‘स्पुटनिक ब्रेन’साठी सन्मानित करण्यात आले. तसेच, नुकतेच त्यांची ‘टूगेदर फॉर टूमारो’ अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्यांचा प्रेरणादायी प्रवास व अनुभवाबाबत सांगितले. त्यांच्या गाथेमधून नाविन्यता व पॅशनची क्षमता दिसून येते, ज्यामधून तरूण विचारवंतांना सर्जनशीलता व निश्चयासह वास्तविक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची प्रेरणा मिळत आहे.
सॅमसंग तरूण विचारवंतांना निपुण करण्याप्रती, त्यांना त्यांच्या दृष्टिकोनांना वास्तविकतेत आणण्यासाठी टूल्स व संसाधनांसह सुसज्ज करण्याप्रती कटिबद्ध आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सॅमसंग, एफआयटीटी व आयआयटी-दिल्लीमधील तज्ञांनी टॉप १० टीम्ससोबत बारकाईने काम केले, तसेच त्यांना वास्तविक विश्वातील आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय सोल्यूशन्स विकसित करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील केले. या मेन्टोरशीपमुळे टीम्सना त्यांच्या संकल्पनांना नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत झाली, तसेच कार्यक्षम प्रोटोटाइप्स विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर या प्रोटोटाइप्सना ग्रँड फिनालेदरम्यान ज्यूरीसमोर सादर करण्यात आले.
यंदा, भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील आणि दुर्गम प्रांतांमधील शाळा व कॉलेजमधून सहभागींनी सहभाग घेतला, जसे मणिपूरमधील इंफाळ, मेघालयमधील ईस्ट खासी हिल्स आणि छत्तीसगडमधील बिलासपूर. स्थानिक आव्हानांचे निराकरण करण्याचा मनसुबा असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसह त्यांनी त्यांच्या समुदायांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तसेच देशभरातील व्यापक समस्यांचे निराकरण करण्याप्रती आणि तंत्रज्ञानाचा वापर करत देशभरात सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्याप्रती योगदान देखील दिले.
२०१० मध्ये प्रथम यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ सध्या जगभरातील ६३ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूण इनोव्हेटर्सनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’शी संलग्न असलेला हा उपक्रम तरूणांना भावी लीडर्स बनण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण व कौशल्यांसह सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर उपक्रमांबाबत अधिक माहितीसाठी आमचे सीएसआर वेबपेज http://csr.samsung.com ला भेट द्या.