नवी दिल्‍ली  : कोका-कोला इंडियाचा जल व्‍यवस्‍थापन, चक्रिय अर्थव्‍यवस्‍था व शाश्‍वत कृषीमधील उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीप्रती त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठित महात्‍मा गांधी अवॉर्ड फॉर कॉर्पोरेट एक्‍सलन्‍स इन कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीसह सन्‍मान करण्‍यात आला आहे. १ ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीच्‍या पूर्वसंध्‍येला नवी दिल्‍लीमधील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे माजी आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

या सन्‍मानाबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशिया (आयएनएसडब्‍ल्‍यूए)च्‍या सीएसआर व सस्‍टनेबिलिटीचे वरिष्‍ठ संचालक राजेश अयापिल्‍ला म्‍हणाले, “आम्‍हाला सीएसआरमधील कॉर्पोरेट एक्‍सलन्‍ससाठी या पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आल्‍याचा आनंद होत आहे. यामधून पर्यावरणीय स्थिरता आणि समुदायांना कृषी, कचरा व्‍यवस्‍थापन इत्‍यादीमध्‍ये शाश्‍वत पद्धतींचा वापर करण्‍यासाठी सक्षम करण्‍याप्रती आमची सातत्‍यपूर्ण कटिबद्धता दिसून येते. या सन्‍मानामधून संपूर्ण टीम, आमच्या सहयोगींची समर्पितता, तसेच आम्‍ही सहयोगाने अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्‍यासाठी करत असलेले प्रयत्‍न दिसून येतात.”

कंपनीच्‍या शाश्‍वतता उपक्रमांची खासियत तीन प्रमुख लक्ष्य क्षेत्रांमध्‍ये आहे: जल व्‍यवस्‍थापन, शाश्‍वत पॅकेजिंग आणि शाश्‍वत कृषी. कंपनीच्‍या २०३० जल सुरक्षितता धोरणाचा संकटग्रस्‍त जलस्रोतांचे पुनर्जतन करण्‍याचा आणि समुदायाला पाणी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रमाणात वाढ करण्‍याचा मनसुबा आहे. फ्रूट सर्क्‍युलर इकोनॉमी उपक्रमाच्‍या, विशेषत: प्रोजेक्‍ट उन्‍नतीच्‍या माध्‍यमातून कंपनी १३ राज्‍यांमधील लहान व अल्‍पभूधारक शेतकऱ्यांच्‍या जीवनात शाश्‍वत कृषी पद्धतींसह आमूलाग्र बदल घडवून आणते, तसेच शेतकऱ्यांना उत्‍पादकता वाढण्‍यासोबत उदरनिर्वाह सुधारण्‍यास मदत करत आहे. दरम्‍यान, कंपनीच्‍या शाश्‍वत पॅकेजिंग प्रयत्‍नांतर्गत वर्ल्‍ड विदाऊट वेस्‍ट’ धोरण डिझाइन, कलेक्‍ट व पार्टनर या आधारस्‍तंभांखालील त्‍यांच्‍या धोरणात्‍मक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून चक्रिय अर्थव्‍यवस्‍थेला चालना देते.

महात्‍मा अवॉर्ड बाबत:

हा पुरस्‍कार जगभरातील सामाजिक प्रभाव घडवून आणणारे प्रमुख आणि चेंजमेकर्सना सन्‍मानित व प्रशंसित करतो, जे समाजात प्रभाव घडवून आणण्‍यासोबत शाश्‍वत भविष्‍याचे नेतृत्‍व करत आहेत. स्‍थापना झाल्‍यापासून महात्मा अवॉर्डने खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील शाश्‍वतता, परोपकार, सामायिक मूल्‍य व कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी अशा सर्वात यशस्‍वी सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमांना सन्‍मानित केले आहे.