“आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या बालपणीच्या मित्रांना विसरत नाही. अशा मित्रा सोबत आपली कधी अनपेक्षित भेट झाली तर तेव्हा वाटणारा आनंद व्यक्त न करण्याजोगाच… असंच काहीसं घडलं खासदार मुरळीधर मोहोळ यांच्यासोबत. पुण्यात ते एका कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्या संरक्षणासाठी आलेल्या पोलिसांच्या ताफ्यात मुरळीधर मोहोळ यांना त्यांचा एक मित्र दिसला. त्यांनी लगेच गाडी थांबवून मित्राची भेट घेतली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. .नेमकं काय घडलं?मुरळीधर मोहोळ हे पुण्यातील चंदगड येथे एका कार्यक्रमाला गेले होते. शिवाजी पाटील यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे सभा घेण्यात आली. ही सभा आटपल्यानंतर मुरळीधर मोहोळ पुन्हा परतत होते. यावेळी एका ट्रॅफिक पोलिसाला पाहून त्यांनी गाडी अचानक थांबवली. त्यानंतर गाडीतून उतरून त्या ट्रॅफिक पोलिसाची भेट घेतली. यावेळी सगळे त्यांच्या या कृतीकडे पाहत राहिले. हा पोलीस कर्मचारी दुसरे कुणी नसून मुरळीधर मोहोळ यांचे मित्र शहाजी पाटील होते. .Bee Attack : किल्ले राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी.शहाजी पाटील हे मुरळीधर मोहोळ यांच्या कोल्हापुरातील तालमीतील मित्र आहेत. शहाजी पाटील दिसताच त्यांनी लगेच गाडी थांबवली. त्यानंतर दोन जुन्या मित्रांची रस्त्यातच भेट झाली. यातून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा आला आहे. दोन्ही मित्र वेगवेगळ्या प्रकारे देशाची सेवा करत आहेत. मात्र तेव्हा दोघांनीही आपलं पद बाजूला ठेऊन जुनी मैत्री आठवत एकमेकांची गळाभेट घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. .तर दुसरीकडे ज्यावेळी एखाद्या मंत्र्यांच्या बंदोबस्ताला पोलीस दलातील एक हवालदार सॅल्यूट मारण्यासाठी उभा असतो. मात्र तोच मंत्री जेव्हा काच खाली घेतो आणि नंतर गाडीतून उतरून या हवालदाराचा सॅल्यूट बाजूला ठेऊन त्याची गळाभेट घेतो, हे दृश्य दुर्मिळ पाहायला मिळतं. तसाच हा प्रसंग होता. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच या दोघांच्या भेटीत त्यांनी फोटो काढले आहेत. तसेच हसत हसत एकमेकांचा निरोप घेतला आहे.