जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने अधिक निरोगी जीवनशैलीसाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व ठळकपणे मांडणारी गोदरेज मॅजिकची प्रभावी मोहीम

गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या मालकीचा मीडिया मंच Godrej L’Affaire वर हात स्वच्छ धुण्याच्या नित्यक्रमावर भर देणाऱ्या डिजिटल फिल्मचे प्रसारण
५०० हून अधिक वर्गांतील मुलांना शिक्षित करणाऱ्या हॅण्ड हायजिन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी टेक फॉर इंडियाशी भागीदारी हा संदेश डिजिटल दुनियेत पसरविण्यासाठी ५० हून अधिक कंटेन्ट क्रिएटर्सना केले सहभागी

मुंबई : नॅशनल सॅम्पल सर्व्हे (NSS)द्वारे भारतात घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशात फक्त ३५.८२ टक्‍के लोक भोजनाआधी नियमितपणे हात स्वच्छ धुतात तर ६० टक्‍के घरांमध्ये फक्त पाण्याने हात धुतले जातात. कोव्हिड-१९ नंतर आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाल्यानंतर नियमितपणे हात धुण्याची रोजची सवय बाळगण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही अनेक अहवालांतून ठळकपणे मांडण्यात आले आहे. त्यामुळे योग्य प्रकारे हात धुण्याची पद्धत आणि नियमितपणे हात धुण्याची सवय लावून घेण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याची कधी नव्हे इतकी निकड निर्माण झाली आहे. “व्हाय आर क्लीन हॅण्ड्स स्टिल इम्पॉर्टन्ट” हे या वर्षीच्या जागतिक हॅण्डवॉशिंग डे (ऑक्टो १५) चे विषयसूत्र, आजही संसर्गांना रोखण्यामध्ये हातांची स्वच्छता किती महत्त्वाची भूमिका बजावते ही बाब अधोरेखित करणारे आहे.

यंदाच्या जागतिक हॅण्डवॉशिंग डेच्या निमित्ताने याच विषयसूत्राशी मेळ साधत गोदरेज मॅजिक हॅण्डवॉश, या गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लि. (GPCL)च्या रेडी-टू-मिक्स हॅण्डवॉशने हात धुण्याच्या योग्य पद्धतींचा पुरस्कार करण्यासाठी व त्याला दैनंदिन सवयीचा भाग बनविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक जागरुकता मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याला अधोरेखित करते: हातांची स्वच्छता ही एक काम उरकण्‍याच्‍या पद्धतीने साध्य होऊ शकत नाही. हात धुणे महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर ती आजारांना नियंत्रणात ठेवण्याची व त्यायोगे एक निरोगी जीवनशैली जगण्यासाठीची एक महत्त्वाची प्रतिबंधक उपाययोजनाही आहे यावर मोहिमेद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गोदरेज मॅजिकने गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या स्वत:च्या मालकीचा मीडिया प्लॅटफॉर्म Godrej L’Affaire शी भागीदारी केली असून. या मंचाद्वारे व्यवस्थितपणे हात धुण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा संदेश खेळकर तरीही प्रभावी पद्धतीने देणारी एक डिजिटल फिल्म प्रकाशित केली आहे. आयुष्यात तुम्ही शॉर्टकट शोधायला गेलात तर काय होतं? अपूर्ण प्रयत्नांतून अखेरीस अपूर्ण परिणामच हाती येतात आणि स्वच्छताही त्याला अपवाद नाही. कल्पना करा, दिवसभर तुम्ही ज्यांवर विसंबून असता त्या सगळ्या गोष्टी एखाद दिवशी अर्ध्याच मिळाल्या तर काय होईल? अर्धाच लंच घ्यायचा, कामासाठी अर्धच डेस्क मिळणार आणि खुर्चीसुद्धा अर्धीच असणार. तुम्ही फक्त एकच हात धुता तेव्हासुद्धा हेच घडत नाही का? विनोदाच्या माध्यमातून आणि चतुराईने रचलेल्या प्रसंगांतून ही फिल्म एक साधा पण अत्यावश्यक संदेश देते: ‘ऑल ऑर नथिंग’ – योग्य स्वच्छता म्हणजे संपूर्ण स्वच्छता अन्यथा ती स्वच्छताच नाही.

हातांची स्वच्छता राखण्याच्या योग्य पद्धतींचा मुलांमध्ये प्रचार करण्यासाठी गोदरेज मॅजिकने टेक फॉर इंडिया या शैक्षणिक समानतेसाठी काम करणाऱ्या, ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेशी भागीदारी केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून टेक फॉर इंडिया नेटवर्कचा