● सध्या, १२६ व्हीपी आणि पीएस सेंटर्स आहेत
पुणे : फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) ही भारतातील आघाडीची मल्टीनॅशनल एडटेक कंपनी भारतात किफायतशीर, उच्च दर्जाच्या शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याप्रती कटिबद्ध आहे. या कंपनीने शैक्षणिक वर्ष २५-२६ साठी देशभरात ७७ हून अधिक ऑफलाइन तंत्रज्ञान-सक्षम अध्ययन केंद्रांच्या लाँचची घोषणा केली आहे. ही नवीन केंद्रे तामिळनाडू, गुजरात, जम्मू व काश्मीर, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत असतील. या विस्तारीकरणासह पीडब्ल्यूची ऑफलाइन फूटप्रिंट दुप्पट होऊन १४१ शहरांमध्ये २०३ केंद्रे असतील, ज्यामुळे सध्याच्या १२६ विद्यापीठ व पाठशाला केंद्रांमध्ये अधिक भर होईल. या धोरणात्मक विस्तारीकरणाच्या माध्यमातून पीडब्ल्यूचा दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे, जेथे विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित आहे. यामधून दर्जेदार शिक्षण देशभरातील सर्वात वंचित भागांपर्यंत पोहोचण्याची खात्री मिळेल.
शैक्षणिक वर्ष २४-२५ मध्ये २००,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूच्या विद्यापीठ आणि पाठशाला केंद्रांमध्ये नोंदणी केली, ज्यामधून संपूर्ण भारतात शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याप्रती पीडब्ल्यूच्या मिशनवरील वाढता विश्वास दिसून येतो. पीडब्ल्यूचा आगामी शैक्षणिक वर्षामध्ये आणखी २५०,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मनसुबा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व संसाधने प्रदान करण्याप्रती समर्पित आहे. यामधून खात्री मिळते की, शिक्षण सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे साधन बनले असून सर्वांना समान संधी देते. सध्या, पीडब्ल्यूचा एक विद्यार्थी देशभरातील प्रत्येक आयआयटी आणि एम्समध्ये (AIIMS) आहे.
पीडब्ल्यूचा ऑफलाइन विभाग दोन मॉडेल्समध्ये विभागण्यात आला आहे – विद्यापीठ (व्हीपी) आणि पाठशाला (पीएस). विद्यापीठ तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन केंद्रे आहेत, जेथे विद्यार्थी अनुभवी शिक्षकांकडून अध्यापन केले जाणाऱ्या वर्गांमध्ये व्यक्तिश: उपस्थित राहतात. पाठशाला मॉडेल अद्वितीय दोन-शिक्षक सिस्टमसह अधिक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन देते. पाठशाला केंद्रांमध्ये व्हर्च्युअली उपस्थित असलेल्या शिक्षकांद्वारे अध्यापन केले जाणाऱ्या प्रत्यक्ष वर्गांमध्ये उपस्थित राहतात, तर दुसरे शिक्षक प्रत्यक्ष वर्गामध्ये उपस्थित असतात, जे विद्यार्थ्यांच्या शंका व चौकशीचे निराकरण करतात. या मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे भौगोलिक स्थान कोणतेही असो प्रतिष्ठित शिक्षकांच्या कौशल्याचा फायदा मिळतो. दोन्ही मॉडेल्सना एकत्र करत पीडब्ल्यूने डिजिटल व प्रत्यक्ष अध्ययन वातावरणांना एकत्र आणले आहे, जेथे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दर्जेदार शिक्षण सतत उपलब्ध करून दिले जाते.
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)च्या ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता म्हणाले, ”पीडब्ल्यूमध्ये आम्ही नेहमी विद्यार्थ्यांच्या गरजा व स्वास्थ्याला प्राधान्य देतो. अधिक केंद्रांचे उद्घाटन करत आमचा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही याची खात्री घेण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार येणार नाही. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आमचा मानसिक व भावनिक तणाव दूर करण्याचा मनसुबा आहे, जो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये स्थलांतरित होताना सामना करावा लागतो. हा तणाव दूर करण्यासाठी आम्ही देशभरात अधिक शैक्षणिक हब्स निर्माण करत आहोत.”
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)ने नुकतेच नॅशनल स्कॉलरशिप कॉमन अॅडमिशन टेस्ट (एनएसएटी) २०२४ चे तिसरे पर्व आयोजित केले. ही टेस्ट ऑनलाइन व ऑफलाइन पर्यायांमध्ये घेण्यात आली, ज्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी २५० कोटी रूपयांचा स्कॉलरशिप निधी राखून ठेवण्यात आला होता, ज्यामुळे ही सर्वात मोठी स्कॉलरशिप टेस्ट ठरली. या उपक्रमाचा नीट-यूजी (NEET-UG) आणि आयआयटी-जेईई (IIT-JEE) परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीकडे न पाहता शिक्षण व तज्ञ मार्गदर्शन देत मदत करण्याचा मनसुबा आहे.