३री राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा घोरपडे, शेट्टे, ताकमोगे, तांबवेकर,  सोमण, आरंडे, गुंजाळ यांना सुवर्णपदक
पुणे  : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा प्रबोधिनी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३-या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संस्कार घोरपडे, सिद्धेश घोरपडे, साहील शेट्टे, मंगेश ताकमोगे, गायत्री तांबवेकर, आभा सोमण, सायली आरंडे, श्वेता गुंजाळ यांनी आपापल्या वयोगटात चमकदार कामगिरी करताना टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
आज या स्पर्धेचे उदघाटन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव, निगडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी, स्पर्धेचे मुख्य कॉमिशर सुदाम रोकडे, आंतरराष्ट्रीय पंच धर्मेंद्र लांबा, स्पर्धा संचालक दिपाली पाटील, मिलींद झोडगे, मिनाक्षी शिंदे, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार भिकन अंबे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते आदी मान्यवर हजर होते.
आज पावसामुळे काही काळ स्पर्धेत व्यतय आला. आज  सर्व वयोगटातील टाईम ट्रायल प्रकारामधील अंतिम स्पर्धा पार पडल्या.
आज झालेल्या स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
टाईम ट्रायल :- युथ बॉईज ५०० मीटर्स – सुवर्ण – संस्कार घोरपडे (पुणे ३८.८९ से.), रौप्य – अर्नव गौंड (पुणे ४२.५२ से.) कांस्य – अनुज गौंड (पुणे – ४२.६२से). युथ गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – गायत्री तांबवेकर (पुणे – ४१.८९ से.), रौप्य – ज्ञानेश्वरी माने (पुणे ४१.८९ से.), कांस्य – मुग्धा कर्वे (पुणे – ४६.०२). सब ज्युनिअर बॉईज ५०० मी.  – सुवर्ण –  सिद्धेश घोरपडे (३६.२५ से), रौप्य – प्रणय चिनगुंडे (३९.६० दोघे क्रीडा प्रबोधिनी), कांस्य – संस्कार घोरपडे (पुणे ३९.७९ से), सब ज्यनिअर गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – आभा सोमण (४१.०१ से.) रौप्य – गायत्री तांबवेकर (४२.३० से.), कांस्य – श्रीवणी परीट (४४.८१ से. सर्व पुणे). ज्युनिअर:- मुले १००० मी. सुवर्ण – साहील शेट्टे (पुणे १.१३.६०), रौप्य – हरीश डोंबाळे (क्रीडा प्रबोधिनी पुणे १.१४.३१) कांस्य – सोहम पवार (पुणे १.१४.९४) मुली ५०० मी. – सुवर्ण – सायली आरंडे (कोल्हापूर ३९.७१ से.) रौप्य  – आभा सोमण (पुणे ४१.०३से) कांस्य – झायना पिरखान (पालघर ४१.७६ से). मेन ईलाईट (पुरुष खुला गट) १००० मी. – सुवर्ण – मंगेश ताकमोगे (१.१२.०३) रौप्य – वेदांत जाधव (१.१२.३७ दोघे पुणे) कांस्य – मंथन लाटे (ठाणे १.१३.२३) वुमेन ईलाईट (महिला खुला गट) – ५०० मी. – सुवर्ण – श्वेता गुंजाळ (पुणे ३९.८० से) रौप्य – सायली आरंडे (कोल्हापूर ४०.४८ से.) कांस्य – आदिती डोंगरे (क्रीडा प्रबोधिनी, पुणे ४१.८८ से)