टाटा मोटर्सला उत्तर प्रदेश राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाकडून १००० बस चेसिसचा पुरवठा करण्‍याची ऑर्डर मिळाली

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने उत्तर प्रदेश राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाकडून (यूपीएसआरटीसी) टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिसच्‍या १,००० युनिट्सचा पुरवठा करण्‍यासाठी प्रतिष्ठित ऑर्डर मिळाल्‍याची घोषणा केली आहे. सरकार निविदा प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून आयोजित करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धात्‍मक ई-बिडिंग प्रक्रियेनंतर टाटा मोटर्सला ही ऑर्डर मिळाली आणि परस्‍पर मान्‍य केलेल्‍या अटींनुसार बस चेसिसचा पुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने करण्‍यात येईल.

गेल्‍या वर्षी मिळालेल्‍या, तसेच सध्‍या यूपीएसआरटीसीद्वारे कार्यक्षमपणे वापर केल्‍या जाणाऱ्या अशाच प्रकारच्‍या १,३५० बस चेसिसच्‍या मोठ्या ऑर्डरची यशस्‍वीरित्‍या पूर्तता केल्‍यानंतर ही ऑर्डर मिळाली. आंतरशहरीय व लांब अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेले टाटा एलपीओ १६१८ डिझेल बस चेसिस उच्‍च दर्जाची कार्यक्षमता आणि सर्वोत्तम पॅसेंजर कम्‍फर्टसह कमी टोटल कॉस्‍ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) देते.

ही ऑर्डर मिळाल्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या कमर्शियल पॅसेंजर वेईकल बिझनेसचे उपाध्‍यक्ष व प्रमुख श्री. आनंद एस म्‍हणाले, ”आम्‍हाला यूपीएसआरटीसीसोबत सार्वजनिक परिवहनाला विस्‍तारित व सुधारित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये सहयोग सुरू ठेवण्‍याचा आनंद होत आहे. टाटा एलपीओ १६१८ बस चेसिस प्रबळ व विश्‍वसनीय गतीशीलतेसह उच्‍च अपटाइम आणि कमी देखभाल व कार्यसंचालन खर्च देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आम्‍ही यूपीएसआरटीसीच्‍या मार्गदर्शनानुसार पुरवठा सुरू करण्‍यास उत्‍सुक आहोत.”

टाटा मोटर्स भारतभरातील विविध शहरांना व राज्‍यांना प्रगत बसेस आणि सार्वजनिक परिवहन सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या हजारो बसेस देशातील रस्‍त्‍यांवर यशस्‍वीरित्‍या धावत आहेत, शहरे व नगरांना दुर्गम भागांपर्यंत कनेक्‍ट करत आहेत आणि लाखो प्रवाशांना दररोज आरामदायी व सुखकर प्रवासाचा आनंद देत आहेत.