नवीन निसान मॅग्नाइट देणार B-SUV विभागात उत्कृष्ट देखभाल खर्चाची हमी

३९ पैसे प्रति/किमी दरात होणार देखभाल. या सेगमेंटमध्ये सगळ्यात किफायतशीर दर
• नवीन निसान मॅग्नाइट देणार ३ वर्ष किंवा १ लाख किमी पर्यंत स्टँडर्ड वॉरंटी, ती अगदी कमी किमतीत सहा वर्षांपर्यंत वाढवता येणार
• प्रीपेम मेंटेनन्स प्लॅन घेतला तर ग्राहकांचे २१ टक्के पैसे आणखी वाचतील.

गुरुग्राम – निसान मोटर इंडियाने त्यांच्या बी-एसयूव्ही प्रवर्गात नवीन ऑफर्स आणल्या आहेत. नवीन मॅग्नाइटच्या देखभालीचा खर्च ५० हजार किमीसाठी आता फक्त ३९ पैसे प्रति किमी होणार आहे. त्यामुळे भारतातील ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. तसंच ग्राहकांना ३ वर्षांची किंवा १ लाख किलोमीटरपर्यंत वॉरंटी मिळाल्याने त्यांच्या डोक्याला शांतता लाभणार आहे. ही वॉरंटी ६ वर्षापर्यंत किंवा दीड लाख किलोमीटरपर्यंत अगदी नाममात्र किंमत देऊन वाढवता येईल. वाढवलेल्या वॉरंटीमध्ये सुटे भाग, दुरुस्ती आणि इतर खर्च अंतर्भूत आहे. म्हणजे नवीन गाडी घेतल्यावर वॉरंटीमध्ये जे अंतर्भूत आहे त्या सगळ्याचा यात समावेश आहे. याचबरोबर देशभरात कॅशलेस रिपेअर, अमर्याद क्लेम्स, आणि देशभरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये चार लेबर फ्री सर्व्हिसेस नवीन निसान मॅग्नाइटसाठी मिळतील.

निसान इंडियाने निसान मॅग्नाइट केअर ही प्रीपेड मेंटेनन्स ऑफरही आणली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशाची २१ टक्के बचत होईल. या योजनेत तज्ज्ञांकडून गाडीची काळजी घेतली जाईल. अगदी अस्सल पार्ट्सचा वापर. डायगनोस्टिक टुल्सचा वापर त्यासाठी करण्यात येईल. त्यामुळे महागड्या दुरुस्त्या टळतील, उच्चकोटीचा परफॉर्मन्स आणि कम्फर्टची हमी मिळेल. ही योजना दोन प्रकारात उपलब्ध आहे.

सर्वसमावेशक सर्व्हिसिंगसाठी ‘गोल्ड’ आणि बेसिक सर्व्हिसिंगसाठी ‘सिल्व्हर’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. गाडी विकली तर नवीन मालकांनासुद्धा ही योजना हस्तांतरित करता येईल. यामुळे रिसेल किंमतही चांगली मिळेल. त्याचबरोबर ३ वर्षांची किंवा १ लाख किलोमीटरची वॉरंटी तर आहेच. त्यामुळे ग्राहकांच्या मनाला समाधान मिळेल आणि गाडीच्या मालकीचा अनुभव आणखी आनंददायी होईल.
निसानच्या अधिकृत सर्विस वर्कशॉपमध्ये गाड्यांची सर्व्हिसिंग केल्यास ग्राहकांना निसानच्या खास सेवांचा लाभ मिळतो. याशिवाय. त्यांच्या गाडीची योग्य काळजी घेतल्यामुळे मन:शांती मिळते. त्यासाठीचे दरसुद्धा अतिशय पारदर्शी आहेत.

निसान मोटर इंडिया प्रायव्हेट इंडिया लिमिटेड (NMIPL) चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “ग्राहकांचं समाधान हे आमच्या कामाच्या केंद्रस्थानी आहे. आमच्या उत्पादन आणि सेवांमधून त्यांना ड्रायव्हिंगचा आणि गाडीचा मालक असल्याचा उत्तम अनुभव कायम देत असतो. प्री-पर्चेस, आफ्टर सेल्स, ऑनलाइन सर्व्हिस बुकिंग्स, निसान सर्व्हिस कॉस्ट कॅल्क्युलेटर आणि विस्तारित डिजिटल इकोसिस्टिम यामुळे आम्ही गाडीबदद्ल कायम पारदर्शकता आणि सोय राखून असतो. निसान त्यांच्या ग्राहकांप्रति वचनबद्ध आहे आणि आम्ही कायमच ग्राहकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेवा पुरवतो. आम्ही ग्राहकांना योग्य मूल्य प्रदान करतो, आणि त्यांच्या ब्रँडबद्दलचा अनुभव चांगला होण्यासाठी प्रयत्नशील असतो.”

ग्राहकांचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी आणि पारदर्शकतेची संस्कृती रुजवण्यासाठी निसान सर्व्हिस हबच्या माध्यमातून कॉस्ट कॅल्क्युलेटर सारख्या सुविधा देतो. त्यामुळे गाडीच्या सुट्या भागाचे किती पैसे होणार आणि मजुरीचा खर्च किती होणार याची माहिती ग्राहकांना लगेच कळते. रोड साइड असिस्टंस या सेवेत स्पीड अलर्ट्स, रिअल टाइम लोकेशन शेअरिंग, इमरजन्सी कॉल्स, आणि रोडसाइड सर्व्हिसेस दिल्या जातात. त्या १५०० शहरात २४/७ उपलब्ध आहेत.

पिक अप आणि ड्रॉप सेवां ग्राहकांना सुलभ होतात. त्यामुळे गाड्यांची योग्य पद्धतीने देखभाल तर घेतली जातेच, पण सगळी देखभालीची कामं झाल्यावर ९० मिनिटांत ती घरी पोहोचवली जाते. ग्राहक ‘निसान डोअरस्टेप सर्व्हिस’चा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे विशिष्ट अंतराने योग्य देखभाल, आणि किरकोळ दुरुस्त्या थेट घरात उपलब्ध होतात. त्यात पुन्हा डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहेच.

डिसेंबर २०२० मध्ये भारतात लाँच झाल्यापासून निसान मॅग्नाइटने बी-एसयूव्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकतेच या लोकप्रिय गाडीचं जागतिक स्तरावर अद्ययावत व्हर्जन , नवीन मॅग्नाइट, लाँच करण्यात आलं आहे. ऑगस्ट २०२४ पर्यंत, देशांतर्गत आणि निर्यात बाजारांमध्ये एकत्रितपणे १.५ लाखांहून अधिक मॅग्नाइट गाड्यांची विक्री झाली आहे.

मॅग्नाइटमध्ये जपानी डिझाइन कौशल्य आणि भारतातील प्रभावी उत्पादन यांचा मिलाफ आहे, निसान मोटर्सच्या मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड तत्त्वाचं हे प्रतिबिंब आहे. ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत, निसानने उच्च दर्जाच्या सेवा पुरवण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर, वाहनांच्या देखभालीत पारदर्शकता आणि किफायतशीर दर यांची हमी देत ग्राहकांचा अनुभव उत्तमोत्तम करण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे

नवीन निसान मॅग्नाइट मध्ये अधिक प्रभावी रोड प्रेझेन्सस बघायला मिळतो. तिचे बाह्य आणि अंतर्गत डिझाइन पुनर्रचित व प्रिमियम दर्जाचं करण्यात आलं आहे. चेन्नईतील अलायन्स जेव्ही प्लांटमध्ये तयार केलेली ही गाडी जागतिक मानकांनुसार विकसित केली आहे, ज्यात मजबूत बांधणीसह सुधारित सुरक्षा दिली जाते.

नवीन मॅग्नाइटमध्ये २०+ फर्स्ट-इन-सेगमेंट आणि बेस्ट-इन-सेगमेंट फिचर्स तसेच ५५+ सुरक्षेचे फीचर्स आहेत. यामध्ये सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट यांसारख्या अत्याधुनिक फिचर्सचा समावेश आहे. ही गाडी बोल्ड इनसाइड आऊट अशा संकल्पनेवर आधारित असून ही गाडी जागतिक ग्राहकांना अतुलनीय मूल्य देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

नवीन मॅग्नाइट केवळ अपेक्षा पूर्ण करत नाही, तर त्या ओलांडते. अत्याधुनिक रोड प्रेझेन्स, सर्वोत्तम तंत्रज्ञान, आणि सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव यामुळे ती विशेष ठरते. या बदलांमुळे निसानची उत्तम मूल्य प्रदान करण्याची बांधिलकी अधोरेखित होते. ज्यांना प्रत्येक बाबतीत वेगळी आणि प्रभावी गाडी हवी आहे, अशा ग्राहकांसाठी ही गाडी उत्कृष्ट पर्याय आहे,