सोने असो किंवा मालमत्ता असो अशा प्रकारच्या महत्त्वाच्या व उच्च मूल्याच्या खरेदीसाठी साडे तीन मुहूर्ताला खूप महत्त्व आहे.ग्राहक अनेकदा खरेदीची तारीख या मुहूर्तांशी जुळवतात,कारण ते शुभ व आनंद आणणारे मानले जाते. सध्याच्या बाजारपेठेचा विचार करता नवरात्र उत्सव आणि दसऱ्यानिमित्त खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून धनत्रयोदशीला देखील त्याचप्रकारे चांगल्या मागणीची अपेक्षा आहे.

महामारीनंतर लक्झरी होम्सची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे.या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी गेल्या वर्षी व्हीटीपी लक्स हा प्रकल्प आम्ही सुरू केला आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळत  आहे.शहरात अशा अलिशान प्रकल्पांना चांगली मागणी कायम राहील व 2024 चा उत्सव काळ गेल्या वर्षीप्रमाणेच चांगला असेल अशी अपेक्षा आहे,असे मत व्हीटीपी रिअल्टीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी यांनी व्यक्त केले.