गोवा, भारत: हर्बलाइफ या प्रमुख आरोग्य व वेलनेस कंपनी, समुदाय व व्यासपीठाने आयर्नमॅन ७०.३ इंडियासोबत सहयोगाची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्या वर्षी हा सहयोग करण्यात आला आहे. या सहयोगामधून प्रीमियम क्रीडा पोषणाच्या माध्यमातून अॅथलेटिक परफॉर्मन्सला पाठिंबा देण्याप्रती हर्बलाइफची कटिबद्धता दिसून येते.
आयर्नमॅन ७०.३ इव्हेण्ट वर्ल्ड ट्रायथॅलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी)शी संलग्न प्रमुख लॉंग-डिस्टन्स ट्रायथॅलॉन आहे. या ट्रायथॅलॉनमध्ये ११३.० किमी अंतर पार केले जाते, ज्यामध्ये १.९ किमी स्विम, ९० किमी बाइक राइड आणि २१.१ किमी रनचा समावेश आहे. नयरनम्य गोव्यामध्ये या रेसचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे अॅथलीट्सना अपवादात्मक अनुभव आणि आव्हानात्मक कोर्स मिळेल.
हर्बलाइफ इव्हेण्टदरम्यान अॅथलीट्सना पोषणासंदर्भात साह्य करेल, ज्यामुळे त्यांना सानुकूल परफॉर्मन्स व हायड्रेशनसाठी आवश्यक असलेली उत्पादने उपलब्ध होण्याची खात्री मिळेल. या उपक्रमाच्या माध्यमातून हर्बलाइफचा आरोग्य व स्वास्थ्याप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा भाग म्हणून व्यायामाला चालना देण्याचा मनसुबा आहे, ज्यामधून क्रीडामध्ये यश किंवा स्वास्थ्यासंदर्भातील ध्येये संपादित करण्यामध्ये पोषणाचे महत्त्व दिसून येईल.
हर्बलाइफ इंडिया येथील सेल्स, मार्केटिंग अँड असोसिएट कम्युनिकेशन्सच्या उपाध्यक्ष पांचाली उपाध्याय म्हणाल्या, ”आम्हाला आयर्नमॅन ७०.३ इंडियासोबतचा आमचा सहयोग सुरू ठेवण्यास सन्माननीय वाटत आहे. हर्बलाइफमध्ये आमचा जीवन उत्साहित करण्यासाठी आणि समुदायांमध्ये संबंध स्थापित करण्यासाठी क्रीडाच्या परिवर्तनात्मक क्षमतेवर विश्वास आहे. आमची आवड आम्हाला अॅथलीट्सना पाठिंबा देण्यास आणि व्यक्तींना त्यांच्या प्रशिक्षणासह आरोग्य व स्वास्थ्याप्रती प्रवासामध्ये सक्षम करण्यास साह्य करण्याला प्रेरित करते. या सहयोगामधून सर्वांना आरोग्यदायी जीवन जगण्यामध्ये मदत करणाऱ्या पोषणाच्या क्षमतेवरील आमचा विश्वास दिसून येतो.”
योस्काचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतातील आयर्नमॅन ब्रँडचे फ्रँचायझी मालक दीपक राज म्हणाले, ”हर्बलाइफ २४ चा आयर्नमॅन ७०.३ गोवासोबतच्या या दीर्घकालीन सहयोगामधून हर्बलाइफची क्रीडा व स्पोर्ट्स पोषणाप्रती कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे अॅथलीट्सना सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत होते. हा सहयोग आयर्नमॅन ७०.३ गोवा इंडिया सारख्या जागतिक स्तरावर प्रतिष्ठित रेसच्या उत्साहाशी संलग्न आहे, तसेच या सहयोगामधून क्रीडाप्रेमींना पाठिंबा देण्याप्रती आणि देशभरातील फिटनेस संस्कृतीला चालना देण्याप्रती समान कटिबद्धता दिसून येते. मी हर्बलाइफ २४ चे सतत पाठिंबा देण्यासाठी आणि आयर्नमॅन ७०.३ गोवा, इंडियासोबत सहयोगासाठी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.”
भारतात क्रीडा पोषणाचे प्रोफाइल झपाट्याने वाढत आहे. आयएमएआरसी ग्रुप (IMARC Group) निदर्शनास आणते की, भारतातील क्रीडा पोषण बाजारपेठेचे मूल्य २०२३ मध्ये जवळपास १.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स होते आणि २०३२ पर्यंत ३.१ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या वाढीला आरोग्याबाबत वाढती जागरूकता, फिटनेस उत्साहींची वाढती आकडेवारी आणि आरोग्यदायी जीवनशैलीला अधिक प्राधान्य अशा घटकांमुळे अधिक गती मिळाली आहे. हर्बलाइफचा स्पोर्ट्स न्यूट्रिशन पोर्टफोलिओ ‘हर्बलाइफ २४’ अॅथलीट्सना रिकव्हरी, हायड्रेशन व एकूण परफॉर्मन्ससाठी मदत करण्याकरिता डिझाइन करण्यात आलेली उत्पादने देत या ट्रेण्डला पाठिंबा देतो.
हर्बलाइफ जगभरातील १५० हून अधिक अॅथलीट्स, टीम्स व लीग्जना प्रायोजित करते, तसेच त्यांना त्यांच्या प्रशिक्षण व स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जात्मक स्पोर्ट्स न्यूट्रिशन उत्पादनांसह साह्य करते. भारतात, हर्बलाइफने अॅथलीट्सना पाठिंबा देणे सुरू ठेवले आहे, जसे विराट कोहली (क्रिकेट), स्मृती मंधाना (क्रिकेट), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), मनिका बत्रा (टेबल टेनिस), मेरी कॉम (बॉक्सिंग) आणि पॅरा-बॅडमिंटन खेळाडू पलक कोहली. हर्बलाइफ प्रमुख टीम्स व स्पोर्टिंग इव्हेण्ट्सना देखील पाठिंबा देते, जसे इंडियन ऑलिम्पिक्स, स्पेशल ऑलिम्पिक्स व कॉमनवेल्थ टीम्स, आयपीएल, प्रो कबड्डी, आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२४ आणि इतर.