महा एनजीओ फेडरेशन कडून पुण्यातील भिक्षेकऱ्यांची दिवाळी गोड बुधवार पेठेत पोषण आहार आणि दीपावली स्वीट बॉक्स ची भेट ; तब्बल ५ हजार कुटुंबाना दिवाळी फराळ
पुणे : महा एनजीओ फेडरेशन तर्फे आत्मनिर्भर दिवाळी २०२४ अंतर्गत आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या सीएसआर अंतर्गत पुण्यातील विविध भागात ५ हजार कुटूंबांना आत्म निर्भर दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील शेकडो भिक्षेकऱ्यानाही महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम गेली ५ वर्षे चालू आहे.
या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील बेवारस, निराधार, अपंग, मतीमंद मुले, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी, पारधी समाजातील शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या वाड्या वस्तीवर आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच स्मशान भूमीतील कर्मचारी आणि सेवक यांना सदर दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. शिवाय ह्या उपक्रमा अंतर्गत ४० महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन आणि महा एनजीओ फेडरेशनच्या पुण्यातील ५० एनजीओच्या सहकार्याने पुण्यातील ठीक ठिकाणी हा दिवाळी फराळ पोच करण्यात आला.
शनिवार वाडा येथील कार्यक्रम भिक्षेकरुंची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनावणे (सोहम ट्रस्ट) यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन शनिवारवाडा फुटपाथवर केले होते. भिक्षेकरी यांचे पुनर्वसन या महत्वाच्या विषयावर शेखर मुंदडा यांनी सकारात्मकरित्या विचार करत येत्या काळात यावर महा एनजीओ फेडरेशन सोबत एकत्रित येत काम करण्याची तयारी दर्शवली.
क्लीन सायन्सचे कृष्णकुमार बुब यांचे ह्या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी महा एनजीओ फेडरेशन वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे, राहुल जगताप, सदस्य रवींद्र चव्हाण,विठ्ठल काळे, अपूर्वा करवा तसेच सोहम ट्रस्टचे डॉ. अभिजित सोनावणे, डॉ.मनीषा सोनावणे आणि सोहम ट्रस्टचे आणि महा एनजीओ फेडरेशनचे अनेक सहकारी उपस्थित होते.
बुधवार पेठेत पोषण आहार आणि दीपावली स्वीट बॉक्स ची भेट
बुधवार पेठ , पुणे येथील ९० एचआयव्ही बाधित महिलांना शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून पोषण आहार आणि दीपावली स्वीट बॉक्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी सेवा संकल्प च्या पदाधिकारी स्नेहा कलंत्री, किरण जाखोटिया, ज्योती मालपाणी, सरोज लद्दर, संध्या शाह, संगीता आगरवाल, मंथन फाउंडेशनच्या अध्यक्ष आशा भट्ट आणि अपूर्वा करवा व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक कविता सुरवसे यांनी केले. महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंदजी शिंदे,संचालक अमोल उंबरजे, कैलास सिकची, राहुल जगताप, रवींद्र चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
* महा एनजीओ फेडरेशन तर्फे आत्मनिर्भर दिवाळी २०२४ अंतर्गत आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या सीएसआर अंतर्गत पुण्यातील विविध भागात ५ हजार कुटूंबांना आत्म निर्भर दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील शेकडो भिक्षेकऱ्यानाही महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.