पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे यांच्यासह इतर पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बंडखोर पाहण्यास मिळाली.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे यांच्यासह इतर पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बंडखोर पाहण्यास मिळाली. यामुळे वरिष्ठ नेत्यांना बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्या सर्व घडामोडी दरम्यान आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यावेळी अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. पण पुणे शहरातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही. यामुळे बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीतील उमेदवाराला अधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, भाजपकडून हेमंत रासने, मनसेकडून गणेश भोकरे आणिकाँग्रेस पक्षाकडून कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहेत. कमल व्यवहारे पहिल्या महिलापुणेशहराच्या महापौर राहिल्या असून त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्ता बहिरट, तर काँग्रेस पक्षाचे नेते मनीष आनंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, मागील विधानसभा निवडणुकीत दत्ता बहिरट यांना काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामुळे फटका बसला होता. त्यावेळच्या निवडणुकीत काही हजार मतांनी दत्ता बहिरट यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा तर थेट पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करित निवडणूक लढवित आहे. यामुळे दत्ता बहिरट यांना मोठ्या प्रमाणावर ताकद लावावी लागणार असल्याचे दिसत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या असूनशरद पवारगटाकडून अश्विनी कदम, तर काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल आणि शरद पवार गटाचे नेते सचिन तावरे या दोन महाविकास आघाडीतील नेत्यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मतविभाजनाचा फटका बसून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांचा विजय सहज मानला जात आहे. तर पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमधील नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण हे नेतेमंडळी अर्ज मागे घेतील अशी शक्यता होती. मात्र या नेत्यांनी अर्ज मागे घेतली नाही. यामुळे या बंडखोरीचा फायदा नेमका कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.