सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, बेंगळुरूने गार्डन सिटी युनिव्हर्सिटी, बेंगळुरूसोबत सहयोगाने केली अत्याधुनिक लिंग्युस्टिक्स लॅबची स्थापना, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगवर लक्ष केंद्रित करते
बेंगळुरू: सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया – बेंगळुरू (एसआरआय-बी)ने ‘सॅमसंग स्टुडण्ट इकोसिस्टम फॉर इंजीनिअर्ड डेटा (एसईईडी) लॅब’ची स्थापना करण्यासाठी गार्डन सिटी युनिव्हर्सिटी (जीसीयू),बेंगळुरूसोबत सहयोग केला आहे. ही लॅब विद्यार्थी व प्राध्यापकवर्गाला एआय/एमएल आणि डेटा इंजीनिअरिंगच्या विश्वाबाबत माहिती जाणून घेण्याची उत्साहवर्धक संधी देते.
लॅबमध्ये जीसीयूचे विद्यार्थी व प्राध्यापकवर्गाला एसआरआय-बीच्या वरिष्ठ इंजीनिअर्सकडून नॅच्युरल लँग्वेज आकलन, संभाषण व मजकूर ओळख आणि मशिन लर्निंग अशा उदयोन्मुख अत्याधुनिक टेक क्षेत्रांवरील संयुक्त प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
सॅमसंगने यापूर्वी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन (व्हीआयटी – वेलोर व व्हीआयटी – चेन्नई) अशा चार एसईईडी लॅब्स लाँच केल्या आहेत, ज्या ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना एआय आणि डेटा-संबंधित प्रकल्पांमध्ये सामील करून घेतात.
“आपण तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असलेल्या काळामध्ये आहोत. आम्ही स्थानिक इकोसिस्टमसोबत सहयोग करत आहोत, जेथे आम्ही टॅलेंट विकसित करण्याचा प्रयत्न करतो आणि भारतीय इंजीनिअर्स / भाषातज्ञांना उद्योगासाठी सुसज्ज करण्यास, तसेच भावी गेम चेंजर्स बनण्यास अपस्किल करत आहोत. गार्डन सिटी युनिव्हर्सिटीसोबतचा आमचा धोरणात्मक सहयोग आमच्या प्रयत्नांना अधिक चालना देईल आणि भारतासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्माण करण्यामध्ये नवीन संधींचा शोध घेईल,” असे एसआरआय-बीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मोहन राव गोली म्हणाले.
जीसीयूमध्ये लॅबची एआय व बहुभाषिक, डेटा-केंद्रित प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यामध्ये भाषातज्ञांच्या क्षमतांचा फायदा घेण्याची योजना आहे, ज्याकरिता डेटासाठी एण्ड-टू-एण्ड पाइपलाइन तयार करत आहे, ज्यामध्ये जागतिक भाषांमधील टेक्स्ट/स्पीच डेटा जनरेशन, इंजीनिअरिंग (क्यूरेशन, लेबलिंग व इतर अनेक), डेटा मॅनेजमेंट आणि संग्रहण यांचा समावेश आहे.
“उद्योगांसोबतचा सहयोग युनिव्हर्सिटीजकरिता कर्मचारीवर्ग आणि भावी इनोव्हेटर्स घडवण्यासाठी महत्त्वाचा आहे. एसईईडी (स्टुडण्ट इकोसिस्टम फॉर इंजीनिअर्ड डेटा) प्रोग्रामच्या माध्यमातून सॅमसंगसोबतचा आमचा सहयोग गार्डन सिटी युनिव्हर्सिटीच्या तत्त्वांशी परिपूर्णपणे संलग्न आहे. मला विश्वास आहे की या सहयोगाचा आमच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, तसेच सॅमसंगचे उद्योग-शैक्षणिक संस्था संबंध अधिक दृढ देखील होतील. हे दोन्ही कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे गार्डन सिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. जोसेफ व्ही. जी. म्हणाले.
५ वर्षांसाठी एसआरआय-बी आणि जीसीयू यांच्यामधील सहयोगात्मक उपक्रम एसईईडी लॅब १,५०० चौरस फूट जागेवर विस्तारित आहे. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लॅबमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत, ज्यामुळे विद्यार्थी डेटासेट्स निर्माण करण्यामध्ये सॅमसंगसोबत सहयोग करू शकतात. लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर, प्रक्रिया व संग्रह करण्यासाठी प्रबळ बॅकएण्ड पायाभूत सुविधा देखील आहेत आणि लॅबमध्ये जवळपास ३० व्यक्ती सामावू शकतात.