वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात २८ मतदारांनी बजावला घरातूनच मतदानाचा हक्क

पुणे : वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगानिर्देशानुसार मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व नमुना १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदार असे एकूण २८ मतदारांनी गृह मतदानप्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा मतदासंघात एकूण ३१ मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क नमुना १२ ड भरून दिलेला होतात्यापैकी २८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

 

गृहमतदान प्रक्रियेकरीता दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यामार्फत मतदाराच्या घरी जाऊन मतदान नोंदविण्यात आले. पथकात एक मतदान अधिकारीएक इतर अधिकारीपोलिस कर्मचारीशिपाईव्हिडीओग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहेअशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर  यांनी दिली.