बालदिनानिमित्त डायमंड पार्क्स लोहगावतर्फे शालेय फ़ुटबॉल स्पर्धा, ‘चिल्ड्रेन्स स्पेशल वीक’
Diamond Parks Lohgaon | Diamond Parks Lohgaon organized a school football tournament & 'Children's Special Week' on the occasion of Children's Day
पुणे: लोहगाव येथील डायमंड पार्क्सच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून ‘प्रायमरी स्कुल महाराष्ट्र लीग २०२४’ या शालेय फ़ुटबॉल स्पर्धेचे, तसेच ‘चिल्ड्रेन्स स्पेशल वीक’चे आयोजन करण्यात आले होते. प्रायमरी स्कुल्स इंडिजिनीयस स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, अंजनेय साठे ग्रुपच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. १८ वर्षांखालील या लहान मुलांसाठी खास आठवडा उपक्रम व स्पर्धेला मुलांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे ग्रामीण संघाने प्रथम, पुणे शहर संघाने द्वितीय, तर नाशिक व पिंपरी-चिंचवड संघाने संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकवला.

प्रायमरी स्कुल्स इंडिजिनीयस स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डायमंड पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन इंदुलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रसंगी प्रायमरी स्कुल्स इंडिजिनीयस स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अंजनेय साठे, लीगचे आयोजन संचालक दीपक अरडे, प्रायमरी स्कुल्स इंडिजिनीयस स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. विल्सन अँड्र्यूज आदी उपस्थित होते. नागपूर, परभणी, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यातून एकूण ९ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या समारोपावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती मुलांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी खेळाविषयी मुलांना मार्गदर्शन केले.

अर्जुन इंदुलकर म्हणाले, “डायमंड पार्क्स संपूर्ण कुटुंबाला मनोरंजनाचा आनंद देणारे ठिकाण आहे. बालदिनाच्या निमित्ताने खास लहान मुलांसाठी आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. मुलांना मनसोक्त आनंद देण्यासाठी विशेष स्वागत करण्यात आले. वीसपेक्षा अधिक पाण्यातील खेळांचा त्यांनी घेतला. मुलांनी १९ हून अधिक आकर्षक आणि शैक्षणिक ऍक्टिव्हीटीज केल्या. सुपरमार्केट आणि कॉस्च्युमसारख्या ऍक्टिव्हिटीजद्वारे प्रात्यक्षिक ज्ञान मिळवले.”

“किडीज पूल, वेव्ह पूल, रेन डान्स झोन, हॉप अ लिटल, एसी प्ले झोन, कोकोनट स्विंग, बॉल पूल आणि स्लाइड्स मध्ये मुलांनी नाच करत आनंद लुटला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळ मुलांनी खेळले. डायमंड पार्क्समधून शहराचे विहंगम दृश्य पाहत मुलांनी विविध प्रकारच्या भारतीय, चायनीज आणि इटालियन खाद्यपदार्थांचा व पेयांचा आस्वाद घेतला. दैनंदिन जीवनातील गर्दीपासून दूर नेण्यासाठी नेचर ट्रेल्स, निसर्गाचा सहवास, तंबूत राहण्याची, बोनफायर व बार्बेक्यू अनुभवण्याची, साहसी खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी मुलांना मिळाली,” असेही इंदुलकर यांनी नमूद केले.

डायमंड पार्क्सने पुण्यातील मनोरंजनाचे उत्तम ठिकाण ही आपली ओळख जपली असून, पार्क्सला ‘एल्डरॉक इंडिया’ पुरस्कार, तसेच ‘आयएसओ ९००१:२०१५’ प्रमाणन मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी डायमंड पार्क्स, लोहगाव (७७२०००६६२२) किंवा www.diamondparks.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन इंदुलकर यांनी केले आहे.