पुणे : बजाज फिन्सर्व्ह एएमसीने आज “बजाज फिन्सर्व्ह हेल्थकेअर फंड” या ओपन एंडेड समभाग योजनेच्या अनावरणाची घोषणा केली असून ही योजना आरोग्य आणि वेलनेसशी संबंधित क्षेत्रांत गुंतवणूक करून दीर्घकालीन वाढीला चालना देते. हा फंड ६ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून नवीन फंड ऑफर कालावधी २० डिसेंबर २०२४ रोजी संपेल.

बजाज फिन्सर्व्ह हेल्थकेअर फंड फार्मास्युटिकल्स, रूग्णालये, निदान केंद्रे आणि वेलनेस अशा क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभाग तसेच समभागांशी संबंधित साधनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून मालमत्ता निर्मितीच्या क्षमतांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य आहे. तो पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक कालावधीसाठी योग्य आहे. ही योजना बीएसई हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय)वर चिन्हांकित करण्यात आली आहे.

या फंडचे उद्दिष्ट भारतीय आरोग्यसेवा क्षेत्राच्या बदलत्या वाढीचा लाभ घेणे आहे. या उद्योगात बदलत्या लोकसांख्यिक रचना, खासगी आरोग्यसेवा खर्चातील वाढ, तांत्रिक सुधारणा आणि इतर घटकांमुळे मोठे बदल होऊ लागले आहेत. हा फंड गुंतवणूकदारांना आरोग्य आणि वेलनेसच्या क्षेत्रातील वाढीचा लाभ घेण्याची संधी देतो आणि या क्षेत्रातील उगवत्या मोठ्या ट्रेंड्समध्ये गुंतवणूक करतो. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय संशोधन आणि उत्पादन, निदान, वैद्यकीय उपकरणे, रूग्णालये, आरोग्यसेवा सुविधा तसेच इतर अनेक गोष्टींचा समावेश असेल. या योजनेतून बीएसई हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय)चा भाग असलेल्या क्षेत्रांमधील किमान ८० टक्के कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल.

बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे सीईओ  गणेश मोहन म्हणाले की, बजाज फिन्सर्व्ह हेल्थकेअर फंड हा आरोग्यसेवा आणि वेलनेस क्षेत्रात सुयोग्य वाढीचा फायदा घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम धोरणात्मक मार्ग आहे. मोठ्या बाजारपेठेशी कमी संपर्क असलेला हा हेल्थकेअर फंड जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रातील विकासाशी जुळवून घेण्यासाठी सज्ज आहे. ही योजना दीर्घकालीन ट्रेंड्स आणि संधींशी जुळणाऱ्या नवीन युगाच्या गुंतवणूक उपाययोजना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हा फंड बाजारात दीर्घकालीन स्थितीत उत्तम कामगिरी करण्यासाठी माहितीपूर्ण, वर्तनात्मक आणि संख्यात्मक लाभ देण्यावर भर देतो.

आरोग्यसेवा फंडविषयी बोलताना बजाज फिन्सर्व्ह एएमसीचे सीआयओ निमेश चंदन म्हणाले की, दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीसाठी आरोग्यसेवा क्षेत्रात प्रचंड संधी आणि क्षमता आहेत. भविष्यातील नफ्याच्या पूल्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून आणि महत्त्वाच्या मेगा ट्रेंड्समध्ये गुंतवणूक करून आम्ही उद्योग वाढीच्या क्षमता जनतेसमोर आणण्याचे ध्येय ठेवत आहोत. या दृष्टीकोनातून हे स्पष्ट होते की, आमचा फंड फक्त विद्यमान संधींचाच लाभ घेत नाही तर गुंतवणूकदारांना बदलत्या आरोग्यसेवा क्षेत्रात शाश्वत विकासासाठी तयार करतो.

या फंडाच्या समभागांचे व्यवस्थापन श्री. निमेश चंदन आणि श्री. सौरभ गुप्ता यांच्याकडून केले जाईल, तर कर्जाच्या भागाचे व्यवस्थापन श्री. सिद्धार्थ चौधरी करतील.

यासाठी अर्जाची किमान रक्कम ५०० रूपये (अधिक १ रूपयाच्या प्रमाणात) असेल तर किमान अतिरिक्त अर्ज १०० रूपये असेल (अधिक १ रूपयाच्या प्रमाणात.) गुंतवणूक वितरित केल्यानंतर तीन महिन्यांत काढून घेतल्यास १ टक्के एक्झिट लोड लागू होईल. या फंडामध्ये ग्रोथ आणि आयडीसीडब्ल्यू (उत्पन्न वितरण आणि भांडवल काढून घेणे) हे दोन्ही पर्याय आहेत.