पुणे  : ” वाचन, सामान्य ज्ञान, उत्तम संवाद कौशल्य, एैकण्यची कला आणि आपला दैनदिन व्यवहार हे जीवनात महत्वाचे असून त्यातूनच उत्तम संस्कारयुक्त व्यक्तिमत्वची ओळख होत असते.,” असे विचार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षा-२०२४’मधील सुवर्णपदक विजेत्या, सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेेशर सभागृहात आयोजित सोहळ्यात त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बालभारती चे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील हे विशेष सन्माननीय पाहुणे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमुख समन्वयक डॉ. एस. एन. पठाण हे होते.
डॉ. चंद्रकांत दळवी म्हणाले,” लहान वयातच मूल्ये रुजवणे महत्वाचे आहे. मूल्ये माणासाला कधीच गोंधळात पडू देत नाहीत. संस्कार माणसाला आंतरिक दृष्ट्या मजबूत बनवतो. चांगले संस्कार ही चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. स्वामी विवेकांनंदांची प्रेरणा घेऊन एमआयटी शिक्षण संस्थचे डॉ. विश्वनाथ दा. कराड हे वैश्विक मूल्याधारित शिक्षण देण्याचे अद्वितीय कार्य करीत आहेत. स्वतःचे व्यक्तिमत्व सुधरायचे असेल तर सर्वात प्रथम शारीरिक आरोग्य सुधारणे आद्य कर्तव्य आहे.”
कृष्णकुमार पाटील म्हणाले, ” मूल्य हे पुस्तकातून वाचून येत नाही तर त्याला जीवनात उतरवावे लागते. बालभारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सतत मूल्य शिक्षण देण्यास आम्ही कटीबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात खेळ आणि कोणताही छंद जोपासावा. तसेच एक जवाबदार नागरिक म्हणून कार्य करावे. देशातील सर्व संस्कृतीचा आदर सन्मान करून भविष्यात मानव विधायक कार्य करावे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” चारित्र्यसंवर्धन आणि जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी या वैश्विक मूल्यांचा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम, बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि नैतिकदृष्ट्या चारित्र्यसंपन्न आणि शिस्तप्रिय असावे. असे युवक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून जगभर ओळखले जातील. नैतिक मूल्यांची शिकवण देऊन भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान भावी पिढीला समजावून सांगावे लागणार आहे.”
डॉ. एस. एन. पठाण यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच प्रस्तावनेत सांगितले की नैतिक मूल्ये मुलांच्या मनात रूजविणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत बदल होतो. उत्तम चारित्र्य हीच जीवनाची खरी संपत्ती आहे.
यावेळी विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात प्रज्ञा कराड, स्वामिनी, श्रदधा हिने विचार मांडले.
सौ. देवयानी पालवे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
राज्यस्तरीय विजेतेपदाबरोबरच पश्चिम विभाग, मराठवाडा विभाग व विदर्भ विभाग अशा तीन विभागांतून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे :
राज्यस्तरीय : संस्कृती राधाकृष्ण कराड (प्रथम), महेक सत्तार शेख (विभागून द्वितीय), प्रज्ञा गोपाळ कराड(विभागून तृतीय).
पश्चिम विभाग :  प्रज्ञा गोपाळ कराड (प्रथम), कृतिका सचिन फत्तेपुरे (द्वितीय), आदर्श मनोहर सातपुते (तृतीय).
मराठवाडा विभाग :  संस्कृती राधाकृष्ण कराड(प्रथम), महेक सत्तार शेख (द्वितीय), उज्वल तात्यासाहेब पवार (तृतीय).
विदर्भ विभाग :  खुशी राजेश महींगे (प्रथम), जान्हवी नितीन बुरंगे (द्वितीय), पयोष्णी विजय पार्शिवकर (तृतीय)